स्वागत

हदगाव(शिवाजी देशमुख)हिमायतनगर - हदगाव विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे इच्छूक उमेदवार नागेश पाटील आष्टीकर यांना उमेदवारी द्यावी अशी इच्छा सामान्य कार्यकर्त्यांची होती. तसेच गात पंचवार्षिक निवडणुकीत खा.सुभाष वानखेडे यांनी उमेदवारी मिळवून देण्याचे वचन दिले होते. नुकतेच मुंबई येथील मातोश्रीवर मुलाखतीसाठी जाऊन शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. मागील काळात पक्ष संघटन वाढीसाठी व सामन्यांसाठी केलेल्या कार्याचा आढावा सादर केल्यानंतर ठाकरे यांनी उमेदवारीला हिरवा कंदील दाखवीत कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत.

मातोश्रीहून आशीर्वाद घेऊन नागेश पाटील आष्टीकर हे बुधवारी मुंबई, नांदेड व्हाया मार्गे हदगाव शहरात दाखल होताच शिवसैनिकासह मतदारांनी जोरदार स्वागत करून भावी आ.नागेश पाटील आष्टीकर यांचा विजय असो अश्या घोषणा देत.. एकच वादा नागेश दादा... अस उदघोषही केल्याने हदगाव शहर दणाणून गेले होते.

हिमायतनगर - हदगाव विधानसभा मतदारसंघात २००९ पासून सातत्याने शिवसैनिक म्हणून कार्य करत शाखा स्थापना, पक्ष मजबुती साठी नागेश पाटील यांनी संपूर्ण विधानसभा मतदारसंघ पिंजून काढला. माजी खा. सुभाष वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली विधानसभा मतदारसंघात अनेक उपक्रमे राबउन युवा कार्यकर्त्यांची मोठी फळी उभी केली आहे. गत पाच वर्षात विकास हाच माझा ध्यास आहे, असे सांगून मतदारसंघातील सामान्य नागरिकांच्या सुख - दुखात सामील होऊन मने जिंकली आहेत. तसेच धार्मिक कार्यातील त्यांचा मोठा सहभाग यामुळे नागेश पाटील आष्टीकर यांचे मताधिक्य वाढले असल्याचे दिसून येत आहे.

त्यांना शिवसेनेने उमेदवारी जवळपास निश्चीत केली असल्याचे संगीतल्यामुळे बुधवारी हदगाव शहरात दाखल होताच युवा शिवसैनिकांसह मतदारांनी जल्लोषात स्वागत करत मतदारसंघाच्या विकासासाठी आपल्या सारख्या निस्वार्थी व्यक्तिमत्वाची गरज असल्याचे अनेकांनी बोलून दाखविले आहे. शिवसैनिक व मतदारांकडून केल्या जाणार्या स्वागताचे मनपूर्वक आभार मानत आगामी निवडणुकीत तुमचे सहकार्य असूद्या नंतरचे पाच वर्ष तुम्हा सर्वांच्या अडचणी, समस्या सोडविण्यासाठी मी इमाने इतबारे काम करीन असे सांगितले.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी