आय. टी. आय. इमारतीला तडे

शहरात शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या इमारतीचे काम गेल्या दोन वर्षापासून कासव गतीने चालू असून, आजही काम सुरूच आहे. सदरील इमारतीला वापरण्यात येणारे बांधकाम साहित्य उदा रेती, सिमेंट, कुरिंग, लाईट फिटिंग, रंग रंगोटी, यासह अन्य साहित्य अत्यंत निकृष्ठ दर्जाचे असल्याने कि काय..? या इमारतीस उद्घाटनापूर्वीच तडे जात आहेत. सदरील बांधकामाच्या एकूण माहितीबाबत कोणतेही दर्शनी फलक लावण्यात आले नसून, काम पूर्ण करण्याचा कालावधी, कामाची अंदाजपत्रकीय किंमत, काम करणाऱ्या एजन्सीचे नाव, कामाची मुद्दत आदी माहिती सुरुवातीला लाऊन काम सुरु करणे बंधनकारक असताना येथे मात्र सर्व नियम पायदळी तुडवून अंदाज पत्रकाला खुंटीला टांगून गुत्तेदाराचा मनमानी कारभार चालविला जात आहे. सदरचे काम करणारा गुत्तेदारास राजकीय वरदहस्त प्राप्त असल्यामुळे आमचे कोण काय वाकडे करणार या अविर्भावात दिसून येत आहे. " बी एंड सी " च्या.. " बसा आणि पैसे छापा " या धोरणामुळे सदरील कामावर नियंत्रण ठेवणारे अभियंते सहा - सहा महिने इकडे फिरकतच नसल्याने निकुष्ठ दर्जाचे काम करून गुत्तेदार आपले उखळ पांढरे करून घेत आहे.

आय. टी. आय. इमारतीचे काम गेल्या दोन वर्षापासून अतिशय संत गतीने होत असलेले बांधकाम पाहता हि इमारत विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाचे धडे गिरविण्यासाठी कि अधिकारी व गुत्तेदाराला मलिदा लाटण्यासाठी असा प्रश्न विचारला जात आहे. सदर इमारतीच्या दर्जाबाबत साशंकता निर्माण होत असताना इमारत विद्यार्थ्याच्या शिक्षणासाठी केंव्हा मोकळी होणार असा प्रश्न ग्रामीण भागातील विद्यार्थी पालक विचारीत आहेत.

कामाच्या सुरुवातीलाच गुत्तेदाराने केली होती ५० ब्रास गौण खनिजाची चोरी...?

इमारतीच्या बांधकामाच्या सुरुवातीला पायाभरणीच्या वेळी संबंधित गुत्तेदाराने १५ ऑगस्ट २०१२ रोजी प्रशासन ध्वजारोहनात व्यस्त असताना काही खनिज माफियासोबत मिलीभगत करून सिरांजनी रस्त्यावरून जेसीबी मशीनद्वारे ५० ब्रास मुरुमाची चोई केली होती. हि बाब या रस्त्यावरून जाणार्या काही ग्रामस्थांनी महसुलाच्या निदर्शनास आणून दिली. त्यावरून नायब तहसीलदार आबासाहेब चवरे, मंडळ अधिकारी सय्यद इसामैल, तलाठी मुंडे, अंभोरे आदींनी चोरीच्या गौण खनिजाची महनी करून ५० ब्रासची वाहतूक विना परवाना करून शासन व जनतेच्या डोळ्यात धूळफेक केली. यावरून संबंधितावर शासन खनिज अधिनियम १९६६ नुसार कलम ४८(३) प्रमाणे ५० ब्रासासाठी बाजारभावाच्या तिप्पट एक लाख साठ हजार(१,६०,०००) दंड लावण्यात यावा असा प्च्नाहानामा तयार करून तत्कालीन तहसीलदार अरुणा संगेवार यांच्याकडे सोपविला होता. परंतु तहसीलदार महाशयांनी स्वार्थापोटी गुत्तेदारावर कार्यवाही न करता अभय दिल्याचा आरोप पर्यावरण प्रेमी नागरिकांनी केला होता.

याबाबत अभियंता नीलकंठ यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले कि, यासाठी जवळपास पाच कोटीचा निधी मंजूर असून, १४ ते १६ महिन्यात बांधकाम पूर्ण करण्याची मुद्दत आहे. मागील १५ते २० दिवसापासून मि साईटवर गेलो नसून, काही अर्धवट काम होणे बाकी आहे. चौकटी, भिंतीला तडे गेल्याचे मला माहित नाही. लाईट फिटिंग, साफ सफाई,कामाचा दर्जा या सह आपणाकडून विचारलेल्या सर्व पाकची मि लवकरच बंदकामाच्या साईटवर जाऊन पाहणी करेन.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी