जागतिक पर्यावरण दिनाचा विसर


हिमायतनगर(वार्ताहर)आंध्रप्रदेश - मराठवाड्याच्या सीमेवरील जंगलाचे रक्षणाची जबाबदारी पार पाडण्यात अपयशी ठरत असलेल्या हिमायतनगर येथील वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयास जागतिक पर्यावरण दिनाचा विसर पडल्याचे दिसून आले आहे.
 

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, हिमायतनगर वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय अंतर्गत आंध्रप्रदेश - मराठवाड्याच्या सीमेवरील वाशी, हिमायतनगर, वाळकेवाडी, पोटा सह अन्य बीटचा कारभार एक वनपरिक्षेत्र अधिकारी, तीन वनपाल आणि वनरक्षक यांच्या निगराणीखाली चालविला जातो. मात्र हिमायतनगर येथील जंगलाचे रक्षण करणारे खुद्द अधिकारीच नांदेड, भोकर सारख्या शहराच्या ठिकाणी राहून ये - जा करीत असल्याने जंगल तोडीच्या प्रमाणात वाढ झाली आहे. तसेच जंगलातील पशु व वन्य प्राण्यांना आवश्यक त्या सुविधा मिळत नसल्यामुळे पर्यावरण बरोबर वन्य प्राणी व मौल्यवान वृक्षाचे अस्तित्व धोक्यात आले आहे.

एकीकडे शासन ०५ जून हा जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा करून पर्यावरण वृद्धीसाठी वृक्ष लागवड करून, वृक्ष्याचे संगोपन करणे, वृक्ष तोड थांबविणे, जंगलाची पाहणी करणे, आदी बाबत जनजागृती निर्माण करणे गरजेचे असते. सर्वत्र हा दिवस उत्साह व जागरूकतेने साजरा केला जात असताना मात्र हिमायतनगर तालुक्यात पर्यावरण दिवस साजरा करणे तर सोडाच या दिवशी बहुतांश अधिकारी, कर्मचारी अनुपस्थित दिसून आल्याने वन अधिकारी कर्मचार्यांच्या कर्तव्याबद्दल साशंकता निर्माण होत आहे. या प्रकाराकडे जिल्हा उपवनसंरक्षक व संबंधितानी लक्ष देऊन पर्यावरण दिवस साजरा करण्यात हलगर्जी पण दाखविणाऱ्या अधिकारी कर्मचार्यांची चौकशी करून कार्यवाही करावी अशी मागणी पर्यावरण प्रेमी नागरिकांनी केली आहे.

याबाबत वनविभागाशी संपर्क साधला असता ते म्हणाले कि, ०५ रोजी गोपीनाथ मुंडे यांच्या निधनाचा शासकीय दुखवटा जाहीर करण्यात आल्याने त्या दिवशी आम्ही वंदिन साजरा करू शकलो नाही असे सांगून हाथ झटकण्याचा प्रयत्न केला.

खरे पाहता वनविभागाने दुखावट्यानंतर तरी वन दिन साजरा करून वक्ष लागवडीसह पर्यावरणाचा संदेश देणे गरजेचे होते असे मत अनेक नागरिकांनी प्रस्तुत प्रतिनिधीस बोलताना व्यक्त केले.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी