मान्यवर नेत्यांची मुंडेना श्रद्धांजली
महाराष्ट्राच्या प्रत्येक भागातील प्रश्नांची आणि जातीपातीच्या राजकारणाची सूक्ष्म जान असलेला लोकनेता म्हणून गोपीनाथ मुंडे यांची ख्याती होती. त्यांच्या जाण्याने कष्टकरी उसतोड कामगार, माली,धनगर,वंजारी, दलित, आदिवासी, ओबीसी, समाज पोरका झाला आहे. त्यांची जीवन शैली नेहमीच धक्का तंत्र देणारी होती. शेवटी जाताना सुद्धा त्यांनी सर्वाना धक्का दिला असून, याचे मला अतिशय दुख आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देओ अश्या शब्दात नांदेडचे आ. ओमप्रकाश पोकर्णा यांनी मुंडेना श्रद्धांजली वाहिली.
गोपीनाथ मुंडे यांचे अपघाती निधनाचे वृत्त समाजाताचे खूप दुख झाले. त्यांनी सुयोग्य नेतृत्वाने भाजपची ताकद ग्रामीण भागात वाढून लोकसभा निवडणुकीचा विजय मिळविण्यात सिंहाचा वाटा दिला होता. नुकतीच केंद्रीय ग्रामविकास मंत्रीपदाची शपथ घेऊन विकासाचा संकल्प केला होता. त्यांच्या जाण्याने मराठवाड्याचे फार मोठे नुकसान झाले असून, हे कधी भरून निघणारे नाही. त्यांच्या महान कार्याला आम्ही कधीही विसरू शकणार नाही अश्या शब्दात हदगाव - हिमायतनगर तालुक्याचे आ.माधवराव पाटील जवळगावकर यांनी मुंडेना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.