९ लाखाची बेहिशोबी मालमत्ता पकडली

हदगाव येथे वेगवेगळ्या घटनेत ९ लाखाची बेहिशोबी मालमत्ता पकडली

हदगाव(वार्ताहर)लोकसभेची रणधुमाळी सुरु असून, कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये म्हणून निवडणूक आयोगाने प्रशासनाला सज्ज राहण्याचे आदेश दिले आहे. त्याचाच एक भाग म्हणून पोलिस अधीक्षक यांनी चेक नाका उभारला आहे. या नाक्यावरून दोन वेगवेगळ्या घटनेत कार मधून ९ लाखाची रोख रक्कम घेवून जात असताना दि.२२ च्या रात्री उमरखेड फाटा येथे पकडण्यात आली आहे.

याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी कि, दि.२२ मार्च च्या रात्रीला १०.३०च्य सुमारास नांदेडहून उमखेडकडे लाल रंगाची हुंडाई कार एम.एच.२९-ए.डी.३००८ हि उमरखेड ती पोईंट या चेक नाक्यावर थांबविण्यात आली. कारची चेकिंग करताना यामध्ये २ लाख ७० हजार अशी नगदी रक्कम डीक्कीमध्ये काळ्या रंगाच्या बैगमध्ये आढळून आली. या बेहीधोबी रक्कमेची सविस्तर चौकशी केली असता सदरील रक्कम यवतमाळ अर्बन को-ओप.बैंक लि.गंगाखेड येथून आणल्याचे साग्न्यात आले. परंतु या व्यवहाराचे बैन्केने कोणतेही कागद पत्रे सादर केले नाही. सादर रक्कमे बाबत अधिक विचारणा केली असता त्यांच्याकडून कोणतेही ठोस पुरावे मिळत नसल्याने सादर रक्कमे बाबत संशय निर्माण झाला. त्यातच आदर्श आचार संहितेचे उल्लंघन केल्यचे निष्पन्न झाले. या कारणावरून हदगाव येथील नायब तहसीलदार वसंतराव माणिकराव नरवडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी बळीराम चव्हाण, संतोष राठोड, निरंजन चव्हाण, सर्व रा.जमुनातंडा ता.उमरखेड जी.यवतमाळ तसेच अमोल शंकर जगताप रा.फैट्री पुसद रोड उमरखेड व चालक परमेश्वर दारूसिंग चव्हाण रा.जवाहर वर्द उमरखेड यांच्या वर मुंबई पोलिस एक्त नुसार कलम १२४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात येउन त्यांना अटक केली आहे.

तर दुसर्या घटनेत याच ठिकाणी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास व्हिस्टा कंपनीची संशयित कार क्रमांक एम.एच.२९- ए.डी.१५९९ थांबविण्यात आली. या कारची झडती घेतली असता कारच्या डिक्की मध्ये करड्या रंगाच्या कापडाच्या बैगमध्ये नगदी ६ लाख ६८ हजाराची रक्कम आढळून आली. विचारपूस कसली असता सदरील रक्कम आनंद ट्रेडिंग कंपनी नांदेड येथून गहू विक्री करून आणल्याचे सांगण्यात आले. परंतु त्या बाबतची कागदपत्रे सादर केली नसल्याने रक्कमेवर संशय घेवून आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केल्या प्रकरणी फिर्यादी साहेबराव गंगाराम वानखेडे विस्तार अधिकारी(कृषी) प.स.हदगाव यांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपी अनुप अनिल मामीडवार, चालक गौसखां बिस्मिल्लाखां पठाण दोघे रा. ढाणकि, ता.उमरखेड, जी.यवतमाळ यांच्यावर हदगाव पोलिस स्थानकात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

हि कार्यवाही पोलिस अधीक्षक परमजीतसिंह दहिया यांच्या मार्गदर्शनाखाली तहसील, पंचायत समिती व पोलिस प्रशासन विभागाचे पोलिस निरीक्षक अरुण बसते, जोंधळे, धोंडू गिरी, गायकवाड, खुपसे, गिरबिडे, कांबळे, शिंगणकर, शीतले, जुडे यांनी केली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना लुभाविण्यासाठी पैश्याचा पुरवठा केला जात होता काय..? अशी शंका आम नागरीकातून उपस्थित केली जात आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी