डी.बी.पाटील यांची उमेदवारी दाखल

हजारो समर्थकांच्या साक्षीने महायुतीचे उमेदवार डी.बी.पाटील यांची उमेदवारी दाखल


नांदेड(अनिल मादसवार)प्रचंड घोषणाबाजी, ढोलताशांच्या गजरात मिरवणूक काढून हजारो समर्थकांच्या साक्षीने भारतीय जनता पार्टीचे उमेदवार डी.बी.पाटील यांनी सोमवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयात जावून उमेदवारी अर्ज दाखल केला. तत्पूर्वी जुना मोंढा येथे झालेल्या सभेत नांदेड लोकसभा मतदारसंघात कमळ ङ्गुलविण्याचा निर्धार करण्यात आला.

उमेदवारी मिळाल्यानंतर डी.बी.पाटील यांनी जिल्हाभरात दौरे सुरु करून झंझावती प्रचार दौरा सुरु केला. गारपीटग्रस्त भागात दौरे करून त्यांनी शेतकर्‍यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. जिल्ह्यात मोदी लाट असल्यामुळे यावेळी नांदेड लोकसभा मतदारसंघात भाजपाचे कमळ ङ्गुलणार या विश्वासाने त्यांनी लोकसभेची उमेदवारी दाखल केली. सोमवारी सकाळपासूनच अनेक वाहनांतून जुना मोंढा येथे कार्यकर्ते व पदाधिकार्‍यांची गर्दी जमू लागली. तेथे झालेल्या सभेत नांदेड नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदी विराजमान करण्यासाठी व देशाच्या विकासासाठी विजयी करण्याचे आवाहन अनेक नेत्यांनी केले. दुपारी साडेबारा वाजेपर्यंत अनेक नेत्यांनी मार्गदर्सन केल्यानंतरभारतीय जनता पार्टींचे नांदेड प्रभारी तथा प्रदेश चिटणीस विजय गव्हाणे यांच्या विशेष उपस्थितीत भव्य मिरवणुकीद्वारे डी.बी.पाटील जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले. यावेळी कार्यकर्त्यांत प्रचंड उत्साह जाणवत होता. भगव्या टोप्या, भगवे रुमाल परिधान करून असंख्य कार्यकर्त्यांच्या घोषणाबाजीमुळे परिसर दुमदुमन गेला होता. शहर व ग्रामीण भागातील कार्यकर्ते आणि पदाधिकार्‍यांची मोठ्या प्रमाणावर गर्दी दिसून आल्यामुळे जिल्ह्यात एकसंघ भाजपा असल्याचे वातावरण निर्माण झाले होते. सर्वच नेते व पदाधिकारी एकत्र आल्यामुळे उमेदवार डी.बी.पाटील यांच्या चेहर्‍यावरील उत्साह द्विगुणीत झाला होता. यावेळी रामपाटील रातोळीकर, डॉ. धनाजीराव देशमुख, माजी आ. अनुसयाताई खेडकर, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख हेमंत पाटील, प्रकाश कौडगे, चैतन्य देशमुख, महेश उर्ङ्ग बाळू खोमणे, प्रविण साले, विजय सोनवणे, गौतमकाळे, शिवाजी भालेराव, प्रल्हाद इंगोले, गोविंदराव सुरनर, रामचंद्र येईलवाड,श्रावण पाटील भिलवंडे यांच्यासह महायुतीचे असंख्य पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी