धाडसी दरोडा..

हिमायतनगर शहरात धाडसी दरोडा.. 
१० लाखाच्या सोन्या - चांदीचा ऐवज लंपास  



हिमायतनगर(अनिल मादसवार)पोलिस स्थानकापासून ३०० मीटर अंतरावर असलेल्या एका भाजपच्या नेत्याच्या घराचे कुलूप तोडून तब्बल १० लाखाच्या सोन्या - चांदीचा ऐवज लंपास केल्याची घटना दि.२२ शनिवारच्या मध्यरात्री घडली आहे. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली असून, सामान्य नागरिकांत सुरक्षेची चिंता वाढली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी पाहणी करून ठसे तज्ञ व श्वान पथकाला पाचारण करण्यात आले. सायंकाळी भोकरचे उपविभागीय अधिकारी सिद्धार्थ कांबळे यांनी भेट देवून पाहणी केली. 

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, शहरातील भाजपचे कार्यकर्ते राजीव उर्फ व्यंकटेश बंडेवार हे दि.२२ रोजी सायंकाळी ७.३० वाजता नांदेड येथे शिक्षणसाठी राहणाऱ्या मुला - मुलीना भेटण्यासाठी घराला कुलूप लाऊन गेले होते. यच संधीचा फायदा घेवून शनिवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. तसेच घरातील बेडरूमला लावलेले कुलूप लोखंडी रोड व स्क्रू ड्रायवरच्या सहाय्याने तोडून आतमधील लोखंडी कपाटाचे कुलूप तोडले. त्यातील लोकर मध्ये असलेले सोन्या - चांदीचे दाग - दागिने व नगदी रक्कम लंपास केली. एवढेच नव्हे देवघरातील आल्मारीची तोड फोड करून समान असता व्यस्त फेकून दिले. त्या कपाटातील चिल्लर दागिने व नगदी रक्कम कडून घेवून चोरट्यांनी हात साफ केला. तसेच घरफोडीसाठी वापरण्यात आलेले साहित्य त्याच ठिकाणी ठेवून चोरट्यांनी पलायन केले आहे. 

दुसर्या दिवशी बंडेवार नांदेडहून परत आले, दुपारी ३ वाजेच्या दरम्यान घरी गेले असता दर उघडे दिसले, आत पाहताच बेडरूम व देवघरातील अलमारीची तोड फोड झालेली व त्यातील लोकर रिकामे  आढळून आले. हि सर्व प्रकार त्यांनी पोलीस्ना सांगितला. घटना स्थळावर पोलिस निरीक्षक सुरेंद्र  सोनवणे, सहाय्यक पोलिस निरीक्षक सुशील चव्हाण, पोलिस जामदार अप्पाराव राठोड यांनी घटन्साठ्ली भेट देवून पाहणी केली. तसेच चोरीचा तपासाची चक्रे गतीने फिरविण्यासाठी श्वान पथक व ठसे तज्ञांना पाचारण करण्यात आले. सायंकाळी उशिरा श्वान पथक शहरात दाखल झाले असून, या ठिकाणी असलेल्या साहित्याच्या वासावरून घराच्या अस पास फिरून शेजारच्या पडक्या घरातून चोरटे फिरल्याचे निदर्शनास आणून दिले. त्यानंतर शहरातील बाजारपेठ, बसस्थानक व अन्य गल्ली बोळात फिरविले. शेवटी शहराबाहेर माग काढला, आणि मुख्य रस्त्याच्या ठिकाणी जाऊन श्वान थांबल्याने चोरटे कोण्यातरी अज्ञात वाहनाने पसार झाल्याचे संकेत दिले आहे.

घटनेच्या पंचनाम्यात घरातील कपाट असलेले एक किलो चांदी ४० हजार, २० ग्रेम सोन्याचे पेंड ५४ हजार रुपये,  ४० ग्रेम सोन्याची दोन चैन ८० हजार रुपये, ६० ग्रेम सोन्याचे गंठन ०१ लाख २० हजार रुपये,  १२० ग्रेम सोन्याच्या पाटल्या व बांगड्या ०२ लाख ४० हजार रुपये, ४० ग्रेम सोन्याचा राणी हार ८० हजार रुपये, ३० ग्रेम सोन्याचे नेकलेस ६० हजार रुपये व २० हजार नगदी रक्कम असा एकूण ७ लाख ९४ हजाराचा जुन्या किमतीनुसार सोन्या - चांदीचा ऐवज लंपास केल्याचा पंचनामा पोलिसांनी केला आहे. तर सध्याच्या बाजारातील किमतीनुसार जवळपास १० लाखावून अधिकचा दरोडा चोरट्यांनी टाकल्याचे दिसून येते. या चोरीच्या घटनेमुळे शहर व परिसरात एकच खळबळ उडाली असून, शहरात पुन्हा चोरट्यांची टोळी सक्रिय झाली कि काय..? अशी शंका नागरीकातून व्यक्त केली जात आहे. घटनेचे वृत्त लिहीपर्यंत अज्ञात चोरट्यांनी केलेल्या चोरीच्या घटनेची नोंद करण्याची प्रक्रिया सुरु होती.

पोलिस गस्तीच्या कमतरतेमुळे चोरट्यांचे फावले..? 

मागील काही महिन्यापासून चोरीच्या घटना थांबल्यामुळे पोलिसांच्या गस्तीत कमतरता आल्याचे  दिसून येत आहे. तर सकाळच्या रामप्रहरी यच पोलिसांची गाडी बेधुंद वेगात रेल्वे स्थानक ते शहर अशी पळविली जात आहे. रात्रीला गस्तीच्या कमतरतेचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी पाळत ठेवून १० लाखाचा हा धाडसी दरोडा टाकल्याची चर्चा घटनास्थळावर उपस्थित नागरिकांच्या तोंडून समोर आली आहे. 

मागील वर्षात चिट्ठी करणे केले होते नागरिकांना हैराण

मागील दोन वर्ष सतत एका चिट्ठी चोरट्याने शहरवासियांना हैराण करून सोडले होते, तर त्या चोरट्याच्या पाळतीवर असलेल्या पोलिसांना सदर चोरट्याने आव्हान देवून एकाच दिवसही तीन ते चार ठिकाणी चोऱ्या केल्या. त्यास जेरबंद करण्यासठी तीन वेळा श्वान पथकाला पाचारण केले. तर दोन वेळा त्यास पकडताना चोर - पोलिसांचा पळा - पळीचा खेळ खेळून जेरीस आणले. परंतु अद्याप त्या चिट्ठी चोरट्याचा पत्ता हिमायतनगर येथील पोलिस लाउ शकली नाही. त्यामुळे आज घडलेल्या धाडसी चोरीच्या घटनेचा तपास हिमायतनगर येथील पोलिस लावेल काय..? असा प्रश्न नागरीकातून विचारला जात आहे.      

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी