NEWS FLASH 1..गणेशोत्सवाबरोबर विधानसभेच्या निवडणुकीचीही होतेय जोरदार चर्चा,2..नांदेड जिल्ह्यात 3 हजार सार्वजनिक गणेश मुर्ती स्थापन होण्याची शक्यता,3...गुटख्याच्या तस्करीवर जरब आणणारे नांदेड पोेलिस नवी दिल्लीच्या बक्षीसास पात्र ठरतील, 4...उत्सव काळात वीजपुरवठा खंडित झाल्यास खपवून घेणार नाही – अ.अखिल अ.हमीद, 5...उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भगत सिंह कोश्यारी महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल, 6... मराठवाड्यात दुष्काळमुक्तीसाठी ‘वॉटर ग्रीड’ योजनेतून पाण्याची व्यवस्था – मुख्यमंत्री फडणवीस, 7...माहूरच्या रामगड किल्यात प्रेमी युगलाचा खुन केल्याच्या आरोपातील 11 जणांची मुक्तता, 8...आगामी विधानसभेत वंचित बहुजन आघाडीचाच माणूस विरोधी पक्ष नेता असेल – मुख्यमंत्री, ..., **

बुधवार, 12 फ़रवरी 2014

महिला परिषदेचे आयोजन

हिमायतनगर येथे बौद्धधम्म महिला परिषदेचे आयोजन

हिमायतनगर(वार्ताहर)शहरातील नालंदा बुद्ध विहार येथे दि.बुद्धीष्ट ऑफ इंडिया(संस्थापक डॉ. बाबासाहेब आंबेडकर) अखिल भारतीय भिक्कू संघ यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय अध्यक्षा महाउपासिका मीराताई यशवंतराव आंबेडकर " बौद्धधम्म महिला परिषदेचे दि.१६ रोजी आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमास समाज बांधवानी उपस्थित राहावे असे आवाहन तालुका शाखा हिमायतनगरच्या वतीने करण्यात आले आहे.

दि.१६ फेब्रुवारी २०१४ रोजी सकाळी ९.३० वाजता येथील पोलिस निरीक्षक सुरेंद्र सोनवणे यांच्या हस्ते पंचशील ध्वजारोहण होईल. सदर बौद्धधम्म महिला परिषदेसाठी बुध्द निस्रन पंचशील - भिक्खू सरिपुत हिमायतनगर, आयु प्रा.भदन्त हर्षबोधी औरंगाबाद, भदन्त बी.अश्वजित्य आर्णी, भिक्खू सत्यधम्म पुसद, भिक्षुणी बोद्धिशिल नागपूर, भिक्खू सरिपुत हिमायतनगर, आदी भिक्खू गण धम्म देसना देणार आहेत. या धम्म परिषदेत प्रा.सुजाता पोपलवार, प्रा.लक्ष्मणराव डोंगरे, प्रा.शिवाजी भदरगे, आदीची धम्म विषयक व्याख्याने आयोजित करण्यात आले आहे. या धम्म परिषदेला धम्म प्रेमी बौद्ध उपासिका - उपासकांनी हजारोच्या संखेने उपस्थित राहून या धम्म परिषदेचा लाभ घ्यावा असे आवाहन भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष पुंडलिक कदम, प्रताप लोकडे, मधुकर वाडेकर, राहुल लोने, सुरेश वाघमारे, संजय सोनसळे, सुरेश गडपाले, अशोक पाटील, नामदेव भरणे, छाया उमरे, केवलाबाई कांबळे, पुष्पाबाई भरणे, प्रवेश दवणे, आदींनी केले आहे.

कोई टिप्पणी नहीं: