वृत्तपत्रे व वृत्तपत्रीय आचारसंहिता
मराठवाड्याचे संपादक श्री.अनंत भालेराव हे भाडोत्री आणि खोटी पत्रकारिता या अग्रलेखात लिहितात की, पुष्कळ चांगले वृत्तपत्रांविषयी लिहून स्वतःची पाठ थोपटून घेता येईल, परंतु आधुनिक वृत्तपत्रांच्या जीवनात चांगल्या प्रमाणेच वाईटही, भरपूर शिरले आहे. तसेच भ्रष्टाचाराबाबत आपले मत मांडतांना पुढे म्हणतात की, माणसाने बाकी सर्व विकले गेले तर चालेल परंतु दानत बाजारात विक्रीसाठी येऊ नये व त्याचा विवेक पैश्याकडे गहाण पडू नये, असे झाले तरच लोकशाहीतील विहित कर्तृत्व्य वृत्तपत्रे पार पाडू शकतील. नेमके घोडे पेंड खाते ते याच ठिकाणी. भ्रष्टतेला, सत्तेला आणि किडलेल्या समाजातील बाजारू वृत्तीला बळी पडणारे किंबहुना विकत मिळणारे पत्रकार व वृत्तपत्रे संख्येने वाढू लागली आहेत. लोकशाही आणि निर्मळ समाजजीवन यांना अशा लोकांकडूनच फार मोठा धोका संभवू शकतो. ...............