जी.प.बांधकाम विभागाकडून केली जाणारे कामे निकृष्ठ दर्जाची ..चौकशीची मागणी
हिमायतनगर(अनिल मादसवार)तालुक्यात जी.प.बांधकाम उपविभाग हदगाव अंतर्गत रस्ते विकासाची कामे हातही घेण्यात आली आहेत. सदरील कामे गुत्तेदाराने अभियंता, उपअभियंता व कार्यकारी अभियंता यांना हाताशी धरून मार्च एंडिंग डोळ्यासमोर ठेवून अतिशय निकृष्ठ दर्जाची कामे उरकून शासनाचा निधी लाटण्याचा सपाटा लावला आहे. झालेल्या व चालू असलेल्या कामाची गुणनियंत्रण मापक मशीनद्वारे चौकशी करून दोषींवर निलंबनाची कार्यवाही करावी. तसेच थातूर - माथुर कामे करणाऱ्या गुत्तेदाराचे नाव काळ्या यादीत टाकून कायदेशीर कार्यवाही करावी अशी मागणी विकास प्रेमी नाग्रीकातून केली जात आहे. .........