जिल्हाधिकारी कार्यालयाने महसूल कर्मचा-यांची सेवापुस्तके केली ‘समृध्द’
राज्यातील पहिलाच उपक्रम: 90 टक्के कर्मचा-यांच्या सेवा पुस्तिका ‘अपडेट’
नांदेड(अनिल मादसवार)जिल्हाधिकारी कार्यालयाने घेतलेल्या विशेष मोहिमेमुळे केवळ दोनच दिवसात जिल्ह्यातील 90 टक्के महसूल कर्मचा-यांच्या सेवापुस्तिका ‘अपडेट’ झाल्या आहेत. जिल्हाधिकारी धीरजकुमार आणि अप्पर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी राज्यात प्रथमच राबवलेल्या या उपक्रमाच्या माध्यमातुन नववर्षाची ही आगळीवेगळी भेट दिल्यामुळे सर्व कर्मचारी सुखावले आहेत. कर्मचा-यांनी आपल्या दैनंदिन कर्तव्यात अनेक वेळा केलेले चांगले काम सेवापुस्तिकेत आता ठळकपणे समाविष्ट आहेत. उपक्रमाच्या यशस्वीतेमुळे कर्मचा-यांच्या भविष्यकालीन प्रगतीचे मार्गही खुले झाले असुन .......