पाणीपुरवठा योजनांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही .. आ.जवळगावकर
सरपंच, पाणीपुरवठा अध्यक्ष व पत्रकारांना निमंत्रण दिले नाही ..
हिमायतनगर(अनिल मादसवार)आगामी काळात निर्माण होणाऱ्या पाणी टंचाई च्या संदर्भात घेण्यात आलेल्या बैठकीस पत्रकार, दस्तूर खुद्द सरपंच, पाणी पुरवठा समिती अध्यक्ष व सदस्यांना न कळविताच ग्राम सेवकाच्या भरवश्यावर पंचायत समितीच्या अधिकार्यांनी परस्पर बैठक उरकून अकेलेचे तारे तोडले. त्यामुळे पंचायत समितीच्या ढिसाळ नियोजन शुन्य कारभाराचा पंचनामा बैठकीस अचानक उपस्थित झालेल्यांनी आमदारांच्या समोर केल्याने तहसीदार व विस्तार अधिकाऱ्याची भंबेरी उडाली होती. तसेच सदर पाणी पुरवठा बैठकीचे माहिती आ.साहेबांकडून मिळाल्याचे काहींनी सांगताच उपस्थित नागरिक सुद्धा अचंबित झाले होते. यावेळी आमदारांनी पंचायत समितीच्या नियोजन शुन्य कारभारावर नाराजी व्यक्त करून उपस्थितांची दिलगिरी व्यक्त केली. ............