12 ते 16 जानेवारी या कालावधीत नांदेड येथे
"मैत्री पक्ष्यांशी" 1226 पक्ष्यांचे चित्र प्रदर्शन
नांदेड(अनिल मादसवार)विद्यार्थ्यांच्या बालमनावर 'पर्यावरण रक्षणाबाबत' सकारात्मक संस्कार रुजवावेत या उद्देशाने जिल्हाधिकारी धीरज कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील सर्व शाळांतील इयत्ता 5 वी ते 9 वीच्या विद्यार्थ्यांकरीता व नागरिकांकरीता अत्यंत माहितीपूर्ण व आकर्षक असे "मैत्री पक्ष्यांशी" हे विविध 1226 पक्ष्यांचे चित्र प्रदर्शन गुरूद्वारा परिसरातील बाबा फत्तेसिंह सभागृह, अबचल नगर, नांदेड येथे 12 ते 16 जानेवारी 2014 या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन 12 जानेवारी रोजी सकाळी 9.30 वाजता पालकमंत्री डी. पी. सावंत यांच्या हस्ते होणार आहे. ...........