शिवनागनाथ मंदिरात चातुर्मास उत्सवाचे आयोजन
हिमायतनगर(वार्ताहर)येथील रेल्वे स्थानक परिसरात असलेल्या शिवनागनाथ मंदिराच्या संयोजकांच्या वतीने प्रती वर्षाप्रमाणे याही वर्षी चातुर्मास उत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून, कार्तिक कृष्ण पंचमी शके १९३५ दि.२२ नोव्हेंबर पासून सुरुवात होणार आहे. या उत्सवात पंचक्रोशीतील भाविकांनी सहभागी होवून शोभा वाढवावी असे आव्हान मोहन सातव, सदशिव सातव, अध्यक्ष सुदर्शन पाटील यांनी केले आहे. .........