“UTS’ मोबाईल एप, अनारक्षित तिकीट खरेदी करण्याचा तुमचा स्मार्ट आणि सोपा मार्ग -NNL


नांदेड|
येथे दिनांक 15 डिसेंबर, 2022 ला औरंगाबाद येथे श्री के. सांबशिव राव, मुख्य वाणिज्य व्यवस्थापक (पॅसेंजर मार्केटिंग), दक्षिण मध्य रेल्वे यांनी औरंगाबाद येथे नांदेड विभागातील वाणिज्य अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासाठी यूटीएस मोबाइल तिकीट अॅपच्या वापरास प्रोत्साहन देण्यासाठी एक चर्चासत्र आयोजित केले होते. 

या चर्चासत्रात श्री नागेंद्र प्रसाद, वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक, नांदेड, श्री रवी तेजा, वाणिज्य व्यवस्थापक, नांदेड,  श्री आर. मोजेस, सहाय्यक वाणिज्य व्यवस्थापक, तसेच नांदेड विभागातील वाणिज्य निरीक्षक, तिकीट तपासणीस, आरक्षण पर्यवेक्षक, बुकिंग पर्यवेक्षक आदी संवर्गातील वाणिज्य कर्मचारी उपस्थित होते.

श्री के. सांबशिव राव, मुख्य वाणिज्य व्यवस्थापक (पॅसेंजर मार्केटिंग) यांनी प्रवाशांमध्ये “UTS” मोबाईल अॅपचा अवलंब वाढवणे आणि प्रमुख स्थानकांवर उपलब्ध ऑटोमॅटिक तिकीट व्हेंडिंग मशीन्स (ATVMs) चा वापर वाढवण्यासाठी उचलल्या जाणाऱ्या पावलांवर तपशीलवार पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन दिले. श्री के. सांबशिव राव, यांनी PoS मशीनद्वारे डेबिट/क्रेडिट कार्ड आणि UPI चा वापर करून तिकीट करताना डिजिटल पेमेंटचा वाटा वाढवण्याच्या गरजेवर भर दिला.


यूटीएसचा अवलंब करून डिजिटल आणि कॅशलेस व्यवहार वाढवल्याने कर्मचाऱ्यांवरील कामाचा भार आणि स्टेशनरी छपाईवरील ताण कमी होतो, असेही ते म्हणाले. त्यांनी विभागीय कर्मचार्‍यांना आवाहन केले की त्यांनी वर्षअखेरीस तिकिटात UTS अॅपचा हिस्सा 20% पर्यंत वाढवावा आणि UPI द्वारे कॅशलेस व्यवहारांना प्रोत्साहन द्यावे.

श्री नागेंद्र प्रसाद, वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक, नांदेड विभाग यांनी आपल्या भाषणात तंत्रज्ञानाचा लाभ घेण्याची आणि तिकीट काढण्याच्या सुलभ पद्धती जसे की "UTS" अॅप आणि स्थानकांवर जनजागृती मोहीम हाती घेऊन ऑटोमॅटिक तिकीट व्हेंडिंग मशीन्सचा प्रसार करण्याची गरज अधोरेखित केली. प्रखर जागरुकता मोहिमेद्वारे प्रवाशांमध्ये UTS अॅप लोकप्रिय करून संपूर्ण विभागातून खरेदी केलेल्या एकूण तिकिटांमध्ये UTS तिकिटांची टक्केवारी वाढवण्यावर भर देण्याचा सल्ला त्यांनी कर्मचाऱ्यांना दिला.

नांदेड विभागातील बुकिंग पर्यवेक्षक, कमर्शियल इन्स्पेक्टर, तिकीट निरीक्षक आणि आरक्षण पर्यवेक्षक यांच्या संवर्गातील मोठ्या संख्येने रेल्वे व्यावसायिक विभागाचे कर्मचारी औरंगाबाद येथील या चर्चासत्रात सहभागी झाले आणि त्यांनी प्रवासी व्यवसायात आणखी सुधारणा करण्यावर आपली मते/सूचना मांडल्या.

 “UTS’ मोबाईल अॅप वापरण्याचे फायदे : - “UTS’ मोबाईल एप अनारक्षित तिकीट खरेदी करण्याचा तुमचा स्मार्ट आणि सोपा मार्ग, UTS एप वापरा, रेल्वे तिकीट खिडकी वर रांग टाळा , R-wallet रिचार्ज वर 3 % बोनस मिळवा.

तुम्ही रेल्वे स्थानकांपासून 20 किलोमीटर अंतरावरून, अगदी तुमच्या घरातूनही अनारक्षित रेल्वे तिकीट खरेदी करू शकता, रांगेत न थांबता काही सेकंदातच तुम्ही तुमच्या मोबाईल वरून अनारक्षित तिकीट खरेदी करू शकता, खरेदी केलेले तिकीट तिकीट तपासनिकास मोबाईल वर दाखवू शकता, सीजन तिकीट 10 दिवसा पूर्वी नूतनीकरण  करू शकता , तिकीट खिडकीवर दिलेले QR कोड स्कॅन करून सुधा तिकीट खरेदी करता येते. 

 मोबाईल वरून तिकीट खरेदी करण्याच्या सोप्या पायऱ्या - मुफ्त नोंदणी करा, लॉग इन करा, तिकीट खरेदी करा, (साधारण/सीजन/फलाटफॉर्म), आर-वालेट वापरून किंवा डेबिट कार्ड/ क्रेडीट कार्ड वापरून किंवा इंटरनेट बँकिंग वरून किंवा युपिआइ वरून पेमेंट करू शकता, खरेदी केलेले तिकीट तिकीट तपासनिकास मोबाईल वर दाखवू शकता, सीजन तिकीट 10 दिवसा पूर्वी खरेदी करू शकता, तिकीट खिडकीवर दिलेले QR कोड स्कॅन करून सुधा तिकीट खरेदी करता येते, मदत क्र. 139 / Rail Madat

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी