भोकर। आज जागतिक एड्स दिनानिमित्त भोकर शहरातील ग्रामीण रुग्णालय आणि राम रतन नर्सिंग कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने सकाळी ९ वाजता च्या दरम्यान भोकर शहरात भव्य रॅली काढून जनजागृती करण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक मार्गे पंचायत समिती कार्यालय तहसील कार्यालय आणि शिवाजी चौक इथपर्यंत जाऊन ही रॅली पुन्हा त्याच मार्गाने परत येऊन नर्सिंग कॉलेजमध्ये विसर्जित झाली.
यावेळी शाळेतील असंख्य विद्यार्थी आणि ग्रामीण रुग्णालयाचे अनेक कर्मचारी उपस्थित होते यात वैद्यकीय अधिक्षक डॉ.अशोक मुंडे, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी अत्रिनंदन पांचाळ, रोहिणी भटकर क्ष-किरण वैज्ञानिक अधिकारी, आरोग्य सहाय्यक सत्यजीत टिप्रेसवार, नितीन जाधव, पायल जाधव, पल्लवी पाटील, सुरेश डुमलवाड, पांडुरंग तमलवाड, नामदेव कंधारे, जाहेद अली, मारोती कठारे, रवी वाठोरे, यांच्यासह अनेकांनी सहभाग घेतला होता.