हिमायतनगर। संगणकीय युगात प्रत्येकाच्याच हातात अँड्रॉइड मोबाईल आला आहे. जेव्हापासून मोबाईल आला तेव्हापासून युवक वर्ग मैदानी खेळापासून दुर चालला आहे. परिणामी अनेकांना अगदी कमी वयातच चष्मा वापरावा लागत असून अनेक व्यादीचा सामना करावा लागत आहे. मैदानी खेळाने शरिर सदृढ बनते, म्हणून आजच्या तरुणांनी मोबाईल मध्ये न अडकता मैदानी खेळाकडे वळावे. असे अवाहन माजी जि. प. सदस्य सुभाष दादा राठोड यांनी केले.
तालुक्यातील महादापूर येथे क्रांतीसुरय् भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त भव्य कब्बडी सामन्याचे उद्घाटन नुकतेच राठोड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. प्रथमतः बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण प राठोड यांनी केला.
पुढे बोलतांना राठोड म्हणाले की, वाडी तांड्यात राहणाऱ्या युवकांनी व्यसनाच्या आहारी न जाता, आपल्या महापुरुषांच्या विचार धारेवर चालावे. थोर क्रांतिकारक बिरसा मुंडा यांच्या कार्याचा आदर्श आपण सर्वानी घ्यावा. असे अवाहन या प्रसंगी माजी जि. प. सदस्य सुभाष राठोड यांनी केले.
यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती डॉ.प्रकाश वानखेडे, माजी जि. प. सदस्य सत्यवृत ढोले, काँग्रेस कमेटीचे शहराध्यक्ष संजय माने, सेवानिवृत्त मुख्याध्यापक तथा पत्रकार अशोक अनगुलवार, के. बी. शेनेवाड, सोनबा राऊत, जि. डी. कापसे, चिचोर्डीचे सरपंच गंगाराम ढोले, महादापूर चे सरपंच प्रतिनीधी शंकर वागतकर ,परसराम ढोले, संदीप झळके, चेअरमन रेणूकादास बुरकूले, विठ्ठल बुरकूले, एकनाथ बुरकूले, माजी सरपंच बंडू बुरकूले, माजी सरपंच विठ्ठलराव देशमूखे, अभिषेक काळे, पोलीस कॉन्स्टेबल मुकाडे, जमादार रंगराव राठोड, माजी चेअरमन विठ्ठल ढाले, कांगणे, वाठोरे, मु. अ. वानखेडे, पृथ्वीराज बुरकूले आदिंसह खेळाडू व पंचक्रोशीतील नागरीकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.