नांदेड/बिलोली| जागतिक वारसा सप्ताहानिमित्त पुरातत्व विभागाच्या वतीने नांदेड जिल्ह्यातील ऐतिहासिक वारसा असलेल्या स्थळांच्या ठिकाणी विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहे.परंतु बिलोली येथील ऐतिहासिक मशिदीत ना कोणता कार्यक्रम,ना विद्युत रोषनाई,ना हेरीटेज वाॕक चे आयोजन ई.बाबत कोणतेच कार्यक्रमाचे आयोजन न करता साफ दुर्लक्ष केले असून या ऐतिहासिक वैभवाच्या लगतच्या परिसरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमणाचा विळखा घातला असून या ऐतिहासिक वारसाची दुरावस्था होत चालली आहे.संबंधित पुरातत्व विभागाला या वास्तूचा विसर पडला असल्याची येथील नागरिकांतून चर्चा होत आहे.
सांस्कृतिक वारसा व स्मारकांच्या संरक्षण,जतन आणि संवर्धनाविषयी जागरुकता वाढविण्याच्या उद्देशाने दरवर्षी दि.१९ ते २५ नोव्हेंबर या कालावधी दरम्यान संपूर्ण जगभर जागतिक वारसा स्थळ सप्ताह साजरा केला जातो.या सप्ताहात देशातील प्राचीन,ऐतिहासिक वारसा बद्दल जनजागृती करणे तसेच या सर्व वारसा स्थळांचे संरक्षण आणि संवर्धन,जतन करणे हे होय.प्रत्येक जिल्ह्यात त्या त्या ठिकाणी असलेल्या वारसा स्थाळांबद्दल जनजागृती अभियान व ईतर कार्यक्रम घेतले जाणार आहे. पुरातत्वीय निकषानुसार जी वस्तू अंदाजे १०० वर्षापेक्षा जास्त जुनी आहे ती वास्तू प्राचीन होय.
मोगल सम्राट शाहजहाँने त्यांचे सेनापती शहिद नवाब सरफराज खान यांच्या देखरेखीखाली सन १६४५ (हिजरी १०३५) मध्ये तुर्की कलाकारांच्या मदतीने बिलोली येथे काळ्या दगडाचा वापर करुन त्या दगडावर कोरीव नक्षिकाम करुन अंदाजे चारशे वर्षापूर्वी बांधलेली मशिद आहे.मशिदीच्या बाजूलाच नवाब सरफराज खान यांची दर्गा आहे.माञ भारतीय पुरातत्व सर्वेक्षण आणि महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्व विभागाला या प्राचीन व ऐतिहासिक वास्तूचा विसर पडलेला दिसतोय.संबंधित विभागाने येथे जनजागृतीचा कोणताच कार्यक्रम ठेवला नाही,कार्यशाळेचे आयोजनही केले नाही.हि त्यांनी दाखवलेली अनास्था होय.त्यांच्या डोळ्यादेखत या ऐतिहासिक वस्तूंच्या लगतच्या परिसरात झालेले अतिक्रमण त्यांच्याच आशिर्वादाने झाले असल्याची चर्चा येथे होत आहे.देगलूर तालुक्यातील होट्टलला ऐतिहासिक वैभव मिळवून देणाऱ्या लोकप्रतिनिधी,जिल्ह्याचे जिल्हाधिकारी व पुरातत्व विभागाच्या अधिका-यांनी बिलोली च्या ऐतिहासिक वैभवाकडे लक्ष देण्याची मागणी येथील ईतिहास प्रेमींकडून होत आहे.