मागण्या तातडीने सोडवा नाहीतर कुलगुरूच्या घरावरच आंदोलन करणार - काॅ. पवन जगडमवार
नांदेड। दि ११ स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या विविध मागण्या घेऊन एसएफआय विद्यापीठ कमिटीच्या वतीने विद्यापीठात आंदोलन करण्यात आले.या आंदोलनात विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
विद्यापीठाची परीक्षा शुल्क अतिवृष्टीमुळे कमी करावी व वाढिव परीक्षा शुल्क तातडीने रद्द करावी, विद्यापीठातील कमवा आणि शिकवा हि योजना तात्काळ सुरू करा, परीक्षा फिस भरण्याची डेट वाढवून द्यावी , किनवट येथील सफाईगार कामगार जनार्धन काळे यांना तात्काळ कामावर घ्यावे. आणि मुलांच्या व मुलींच्या वस्तीगृत विद्यापीठात आर.ओ. फिल्टर पाण्याची सोय करावी.शैक्षणिक शुल्क व परीक्षा शुल्क माफ करावी.
यासह इतर विविध मागण्या घेऊन हे आंदोलन करण्यात आले.त्यावेळी विद्यापीठ प्रशासनाने विद्यार्थ्यांना चर्चेसाठी बोलवून मागण्या तात्काळ सोडवण्याचे आश्वासन दिले. विद्यार्थ्यांच्या मागण्या तातडीने सोडवले तर ठिक अन्यथा थेट कुलगुरूच्या घरावरच आंदोलन करण्यात येईल असा इशारा एसएफआयचे काॅम्रेड पवन जगडमवार यांनी दिले.यावेळी विद्यार्थ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत विद्यापीठ परिसर दणाणून सोडले होते.
यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले त्यामुळे शेतकरी आत्महत्या करीत आहेत. मात्र अद्याप शेतकऱ्यांना सरकार कडून कोणतीही मदत मिळाली नाही. त्यामुळे शेतकरी मायबापानी आत्महत्या करू नये असे फलक विद्यार्थ्यांनी हातात घेऊन शेतकऱ्यांना धीर देण्याचे प्रयत्न केले.अशा वाईट परिस्थितीत विद्यार्थी घरून पैसे मागुन आपल्या शेतकरी मायबापाला मृत्युच्या दारात ढकलू शकत नाहीत.त्यामुळे कमवा आणि शिका ही योजना सुरू करावी अतिवृष्टीमुळे या वर्षी विद्यार्थ्यांन कडून आकारण्यात येणारी परीक्षा शुल्क व शैक्षणिक शुल्क माफ करून गोरगरीब विद्यार्थ्यांना न्याय द्यावे.अशी मागणी एसएफआयने केली.यावेळी एसएफआय चे जिल्हा सचिव काॅ. मिना आरसे , शहर अध्यक्ष स्वप्नील बुक्कतरे , उपाध्याक्ष विशाल बद्रे , विद्यापीठ कमिटीचे काॅ.पवन जगडमवार , इरापत्ते ऋषीकेश , काॅ.शाम सरोदे , काॅ.जयराज गायकवाड , संतोष मंत्री , गायत्री काकडे ,विनय यंगलवाड यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.