घुंगराळा-तलबिड निसर्ग पर्यटन केंद्र व तिर्थक्षेत्र/तिर्थस्थळाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध -NNL

वनमंत्री ना.सुधिरभाऊ मुनगंटीवार यांचे भाजपा नेते बालाजी बच्चेवार व पत्रकार लक्ष्मणराव मा.भवरे यांना आश्वासन


नायगांव बा।
घुंगराळा-तलबिड निसर्ग पर्यटन केंद्र व तिर्थक्षेत्र/तिर्थस्थळाच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबद्ध असून यासाठी लवकरच विकास आराखडा तयार करुन घेत भरीव निधी देऊ असे आश्वासन राज्याचे वनमंञी ना.सुधिरभाऊ मुनगंटीवार यांनी दिले.

 राज्याचे वनमंत्री मा.ना.सुधिरभाऊ मुनगंटीवार यांची नांदेडमध्ये आल्यानंतर भाजपा नेते दिलीप कंदकुर्ते यांच्या निवासस्थानी भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य बालाजी बच्चेवार व नांदेड जिल्हा मराठी पञकार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष तथा, तालूका प्रभारी आणि राष्ट्रवादी किसान सभेचे माजी प्रदेश प्रथिनिधी लक्ष्मणराव मा.भवरे यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना घुंगराळा-तलबिड निसर्ग पर्यटन केंद्र (ता.नायगांव खै.जि.नांदेड) व या तिर्थक्षेत्र/तिर्थस्थळासाठी तात्काळ निधीची तरतुद करावी याबाबत सातत्याने आपणांस विनंतीनुसार व आपल्या आदेशानंतरही संबधित विभाग योग्यतेने कार्यवाही करित  नसल्याची माहिती स्वतंत्र निवेदन व पुराव्यानिशी दिली. 

सोबतच,आपल्या आदेशावरून तत्कालीन उपवनसंरक्षक सुजय दोढल व त.सहा. वनसंरक्षक डि.एस.पवार यांनी स्वतः या परिसराची पहाणी करुन अहवाल सादर केल्यानंतर तत्कालीन जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांनीही याबाबत लक्ष दिले.त्यामूळेच महाराष्ट्र राज्य निसर्ग पर्यटन मंडळ,नागपूर यांनी दि.२७ जुलै २०१७ रोजी कार्यकारी समितीच्या बैठकीत या निसर्ग पर्यटन केंद्रास मान्यता मिळाली होती.परंतू,स्थानिक वनविभागाने विकास आराखडा सादर केल्यानंतरही त्यात अनेकदा त्रुटी काढण्यात आल्या होत्या.याबाबत आपणच स्वतः राज्याच्या वनविभागाचे तत्कालीन सचिव विकास खारगे यांना या प्रकरणात तात्काळ नियमानुसार तपासणी करण्याचे आदेश दिले होते तर,तत्कालिन सहसचिव सुजय दोढल यांनीही संबंधितांना तातडीने योग्यतेने अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

परंतू,या प्रकरणात आजपर्यंत योग्यतेने विकास आराखडा सादर केला नसल्याची त्रुटी ठेवून त्यास मान्यता मिळालेली नाही व यासाठी निधीची तरतूद करण्यांत आलेली नसल्याची खंत व्यक्त करुन सामाजिक भावनेतून आपण याबाबत गत अनेक वर्षांपासून पाठपुरावा करित असल्याचे मत चर्चेतून लक्ष्मणराव मा.भवरे यांनी यावेळी व्यक्त केले.त्यास दूजोरा देत बालाजी बच्चेवार यांनीही याबाबत आग्रही भूमिका मांडल्यानंतर वनमंत्री ना.सुधिरभाऊ मुनगंटीवार यांनी यापूर्वी आपल्याच कार्यकाळातील मंजूरी असलेल्या या निसर्ग पर्यटन/वनपर्यटनाचा स्थानिक विभागाकडून नव्याने विकास आराखडा तयार करुन घेऊन त्यास मान्यता देऊ सोबतच,या परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी भरीव निधीची तरतूद करण्यात येईल असे  स्पष्ट केले.

निश्चितच विकास होणार - बालाजी बच्चेवार

दरम्यान वनमंत्री ना.सुधिरभाऊ मुनगंटीवार यांनी आपल्या भेटीत याबाबत स्वतःच लक्ष देऊ असे अभिवचन दिल्याने आगामी काळात या परिसराचा निश्चितपणे सर्वांगीण विकास होईल असा विश्वास भाजपा नेते बालाजी बच्चेवार यांनी व्यक्त केला.

यापूढेही पाठपुरावा सुरुच राहिल -लक्ष्मणराव मा.भवरे

प्रारंभी तिर्थक्षेत्र व तिर्थस्थळासाठी व त्यानंतर निसर्ग पर्यटन केंद्रांसाठी आपल्याच विनंतीनंतर मंजूरी मिळाली असली तरिही या भागातील वनजमिन एकत्रित संपादित करून त्यात विविध बाबींचा समावेश असलेला विकास आराखडा तयार करुन त्यास मान्यतेसह भरिव निधीची तरतूद व त्यातून दर्जेदार कामांतून या भागाच्या सर्वांगीण विकासासाठी गत अनेक वर्षांपासून आपण सातत्याने प्रयत्न करित आहे.सदर मागणीच्या परिपूर्ण पूर्ततेपर्यंत आपला पाठपुरावा यापूढेही सुरुच राहिल असे मत लक्ष्मणराव मा.भवरे यांनी व्यक्त केले.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी