हिमायतनगर। ग्रामीण शिक्षण संस्था संचलित,हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालय,हिमायतनगर येथे भारताचे पहिले पंतप्रधान ' पंडित जवाहरलाल नेहरु यांची जयंती ' ,जैव तंत्रज्ञान दिन ' व बालक दिन म्हणून साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. उज्ज्वला सदावर्ते मॅडम लाभल्या होत्या,प्रमुख वक्ते म्हणून इतिहास विभाग प्रमुख डॉ.वसंत कदम व राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. लक्ष्मण डोंगरे हे होते.प्रथमतः प्रमुखांच्या हस्ते 'पंडित जवाहरलाल नेहरू ' यांच्या प्रतीमीचे पुष्पहार घालून पूजन करण्यात आले. डॉ कदम सर यांनी पंडित नेहरू हे तंत्र ज्ञानाचे उपासक ,समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि लोकत्तंत्रिक गणतंत्राचे तज्ञ होत असे सांगितले. तर डॉ.डोंगरे यांनी पंडित नेहरू आधुनिक भारताचे रचनाकार असून ,लोकशाहीचे खरे प्रणेते होत ,ज्या देशात टाचनिही तयार व्होत नसे त्या देशात मोठमोठे उद्यागधंदे निर्मिती पंडित नेहरू मुळेच झाली.
भारत व इतर देशांचे संबंध सुधारले असे प्रतिपादन केले.अध्यक्षीय समारोपात डॉ. सदावर्ते यांनी सर्वांना बालक दिनाच्या शुभेच्छा देऊन, जैव तंत्रज्ञान दिनाचे महत्त्व सांगितले. या प्रसंगी महाविद्यालयातील शिक्षक , शिक्षकत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते .कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सांस्कृतीक विभाग प्रमुख डॉ . सविता बोंढारे तर आभार प्रदर्शन सांस्कृतीक विभागप्रमुख सहाय्यक प्रा.आशिष दिवडे सर यांनी केले.