पुण्याच्या नवले ब्रिजवरील अपघाताची मुख्यमंत्र्यांकडून दखल -NNL

भरधाव ट्रक 48 वाहनांना नवले ब्रिजवर धडकला; 20 जण जखमी, अपघातानंतर ट्रकचालक फरार


पुणे|
मुंबई-बंगळुरू बाह्य वळण महामार्गावर नवले पूल परिसरात भरधाव वेगाने जात असलेल्या चालकाचे उतारावर नियंत्रण सुटल्याने ट्रकने ४८ वाहनांना धडक दिली. या भीषण अपघातात २० जण जखमी झाले. हा अपघात रविवारी रात्री ४.४५ वाजेच्या सुमारास घडला. घटनेची माहिती मिळताच पुण्याच्या नवले ब्रिजवरील अपघाताची मुख्यमंत्र्यांनि तातडीने दाखल घेतली. वाहतूक कोंडी दूर करून वाहनधारकांना त्रास होणार नाही हे पाहण्याचे निर्देश देखील त्यांनी दिले आहेत.

आंध्र प्रदेशमधील मालवाहतूक करणारा एक ट्रक रविवारी रात्री साताऱ्याहून मुंबईच्या दिशेने जात होता. नवले ब्रिज परिसरातील दरी पूल पार केल्यानंतर ट्रक नवले पुलाजवळील तीव्र उतारावर आल्यानंतर चालकाचे नियंत्रण सुटले. ट्रकने समोरून येणाऱ्या कार आणि रिक्षा यांना धडक दिली. हा ट्रक ४०० ते ५०० फूट गेला. वाहनांना धडकून थांबल्यानंतर चालक ट्रक सोडून पसार झाला. वाहनांत अनेक चालक अडकून पडले पोलिसांनुसार अपघातग्रस्त वाहनांत अनेक चालक अडकून पडल्याने गोंधळ उडाला. 

या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या व्हॅन तसेच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. अपघातग्रस्त वाहने बाजूला काढण्याचे काम सुरू करण्यात आले. गंभीर जखमी झालेल्या लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. ऑइल सांडल्याने रस्ता वाहतुकीस बंद ४८ वाहने अपघातग्रस्त झाली असून २० जण जखमी झाले आहेत. सहा जणांना दोन रुग्णालयांत दाखल करण्यात आले आहे. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात ऑइल सांडले आहे. हा रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आलेला आहे, अशी माहिती पोलिस उपायुक्त सुहेल शर्मा यांनी दिली.

पुण्याच्या नवले ब्रिजवरील अपघाताची मुख्यमंत्र्यांकडून दखल

पुणे येथे नवले ब्रिजवर रात्री टँकरच्या धडकेने अनेक वाहने दुर्घटनाग्रस्त होऊन झालेल्या अपघाता विषयी मुख्यमंत्र्यांनी पोलिसांकडून माहिती घेतली आहे. हा अपघात कुणाच्या निष्काळजीपणामुळे झाला तेही तपासण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. तसेच अपघातातील जखमींना योग्य ते उपचार मिळण्याची व्यवस्था करण्याच्या सूचना देखील त्यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. अपघातामुळे या भागात मोठ्या प्रमाणावर झालेली वाहतूक कोंडी दूर करून वाहनधारकांना त्रास होणार नाही हे पाहण्याचे निर्देश देखील त्यांनी दिले आहेत.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी