भारत जोडो यात्रेला सकारात्मकतेने घेण्याची गरज -NNL


स्वातंत्र्यानंतर भारत देशाने लोकशाही शासन व्यवस्था स्विकारली आणि जनतेच्या मनातील राज्य भारत देशामध्ये अस्तित्वात आले. लोकशाहीच्या माध्यमातुन जनतेने काँग्रेस पक्षाला स्वईच्छेने सत्तेवर बसवले. भारतीय राज्यघटनेतील स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि सामाजिक न्याय या जिवनमुल्यांना सत्तेच्या माध्यमातुन प्रत्यक्षात उतरवण्याचा दृढ निश्चय काँग्रेस पक्षाने केला आणि संवैधानिक मार्गाने अनेक राष्ट्रीय संस्था, निवडणुक आयोग, नियोजन आयोग, राष्ट्रीय शिक्षण आयोग, महाविद्यालय अनुदान आयोग, भारतीय लोकसेवा आयोग, प्रत्येक राज्यांमध्ये राज्य लोकसेवा आयोग, वखार महामंडळे, शाळा, महाविद्यालये, तंत्रशिक्षण महाविद्यालये, भारतीय अन्न महामंडळ, आरोग्य यंत्रणेचे जाळे, देशभर रेल्वेचे जाळे, यांसारख्या संस्थांच्या माध्यमातुन तयार केले. तसेच देशातील उपेक्षित, व ंचित घटकांसाठी स्वस्त धान्य योजना, बेघरांसाठी इंदिरा आवास योजना, निराधारांना श्रावण बाळ योजना, दारिद्र्य रेशेखालील समाज घटकांसाठी विविध कल्याणकारी योजना कार्यान्वीत करुन देशातील सर्व समाज घटकांच्या सर्वांगीण विकासासाठीचे नियोजन काँग्रेस पक्षाने लावले.  

देशातल प्रत्येक जाती-धर्मातील व्यक्ति ही आपल्या विकासासाठी काँगे्रस पक्षच हवा म्हणून काँग्रेसकडे बघते. काँग्रेस या राष्ट्रीय पक्षाचे पंडित जवाहरलाल नेहरु, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांनी देशासाठी अहोरात्र कार्य केले. एवढेच नाही तर स्व. इंदिरा गांधी आणि त्यांचे पुत्र राजीव गांधी यांनी देशासाठी अंगावर गोळ्या झेलून स्वतःचे बलिदान दिले. एकंदरित काँग्रेस पक्षाने देशाच्या विकासाचा पाया तयार केला आहे.त्यामुळे काँग्रेस पक्ष हा सामान्य जनतेच्या हितांचे रक्षण करणारा, प्रत्येक भरतीयांच्या हाताला काम देणारा, सामाजिक समतेचा पुरस्कार करुन सर्वसामान्य जनतेचे जिवनमान उंचावण्यासाठी भारतीय संविधानातील तरतुदीनुसार धर्मनिरपेक्षतेचे तत्व मान्य करुन धोरणात्मक कार्य करणारा पक्ष असल्याची धारणा सर्वसामान्य जनतेची होवून काँग्रेस पक्षाला दिर्घकाळ केंद्रामध्ये तसेच बहुसंख्य राज्यांमध्ये सत्ता मिळवून दिली.

देशाचा सर्वच क्षेत्रामध्ये सर्वांगीण विकास झाला आहे. संस्थात्मक पध्दतीने काँग्रेसने देशाच्या विकासाला प्राधान्य दिले आहे.त्यामुळे स्वातंत्र्यानंतर काँग्रेस पक्षाला देशातील सर्व समाजाने पुरोगामी विचारधारा माणनारा, विज्ञानाचा, आधुनिकतेचा पुरस्कार करणारा पक्ष म्हणून मान्यता दिली आहे. संस्थात्मक रितीने केलेल्या विविध क्षेत्रातील योजनांच्या माध्यमातुन देशातील प्रत्येक समाज घटकांतील स्री-पुरुष आपला विकास करुन घेत आहेत.परंतु अलिकडे राजकिय क्षेत्रातील व्यक्तिंच्या महत्वाकांक्षा मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. देशातील जनतेला विविध विकासाची स्वप्ने दाखवून सत्ता हस्तगत करुन आपले इप्सित साध्य करण्याची चढाओढ राजकिय पक्षामध्ये लागल्याचे दिसून येत आहे. संवैधानिकरित्या तयार केलेल्या संस्था, योजना बंद करुन आपल्या कल्पनेनुसार रात्रीतुन थातुरमातुर योजना तयार करुन त्यांची जाहिरात करुन जनतेचा झटपट आम्ही विकास करु अशी आश्वासने देवून सत्ता हस्तगत करण्याचे नियोजन विविध राजकिय पक्षांडून लावले जात आहे. 

२०१४ मध्ये केंद्रात भारतीय जनता पार्टीचे सरकार आले आणि काँग्रेस पक्षाच्या माध्मतातुन संवैधानिकरित्या तयार करण्यात आलेल्या सर्वच संस्था, आयोग बदलून ते नवीन तयार करण्याचा सपाटा लावला आहे. भारतीय जनता पक्षाने नविन विकास योजना तयार करुन जनतेचे जिवनमान उंचावण्यापेक्षा काँग्रेस सरकारने ७० वर्षात काय केले असा प्रश्न उपस्थित करुन जनतेच्या मनात काँग्रेस बद्दल तिरस्कार निर्माण केला जात आहे. देशातील स्वातंत्र्य, समता, बंधुता, सामाजिक न्याय या मानवी मुल्यांना संपविण्याचे तसेच अभिव्यक्ति स्वातंत्र्यावर बंधने घालुन एकाधिकारशाही निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

त्यामुळे भारतीय संविधानाने देशातील जनतेला दिलेले सर्व प्रकारचे स्वातंत्र्य अबाधीत राहावे, सर्व संवैधानिक संस्थां, महामंडळे, विविध प्रकारचे आयोग, समित्या, शासकिय योजना, कारखाने कायम ठेवून त्यांच्या माध्यमातुन जनतेचा विकास करण्यात यावा तसेच देशातील जनतेमध्ये बंधुभाव, एकता, अखंडता, प्रेम, आपुलकी कायम राहावी, वाढती बेरोजगारी, महागाई कमी व्हावी, देशातल शासकिय उद्योग, कारखाने, रेल्वे, विमान हे विशीष्ट खाजगी उद्योगपतींना विकल्या जावू नयेत, खाजगी उद्योग एकाच राज्यामध्ये स्थापन होवू नयेत, राजकिय  एकाधिकारशाही निर्माण होवू नये म्हणून काँग्रेस नेते खा. राहुल गांधी यांनी कन्याकुमारी ते कश्मिर अशी भारत जोडो यात्र काढली आहे. या यात्रेला देशातील जनतेतून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. सर्वच क्षेत्रातील, समाज घटकातील स्री-पुरुष, युवक, वयोवृध्द या यात्रेत उत्साहाने सहभागी होवून या यात्रेचे स्वागत करीत आहेत. संपूर्ण देशभर या यात्रेमुळे उत्साह संचारला आहे.

आपल्या जिवाची पर्वा न करता खा. राहुल गांधी दररोज २५ ते ३० कि.मी. अंतर उन्हातान्हात पायी चालत आहेत. त्यांच्यासोबत परिवर्तनाच्या अपेक्षेने प्रत्येक जिल्ह्यातील  अबाल वृध्द जिवाची पर्वा न करता मोठ्या उत्साहने चालत आहेत. पदयात्रेच्या मार्गावरील प्रत्येक रस्त्यावर, गाव शहरामध्ये सर्व समाज घटकातील महिला प्ाुरुष हातात तिरंगी ध्वज घेवून प्रचंड संख्येने पदयात्रेत सहभागी होत आहेत.  खा. राहुल गांधी यांच्या पदयात्रेचा उद्देश आणि लोकशाही अबाधीत राहुन सर्व समाजघटकांचा संवैधानिकरित्या विकास व्हावा हा प्रामाणिक उद्देश असल्याचे त्यांच्या प्रत्येक जिल्ह्यातील सभेतील भाषणांतुन दिसून येत आहे. त्यामुळे विविध राजकिय पक्षांनी, सर्वसामान्य जनतेने या यात्रेला धार्मिक किंवा स्वार्थी राजकारणाचे रुप देवून या यात्रेला सहज समजू नये. एवढ्या मोठ्या प्रमाणात सहभागी झालेल्या जनतेच्या उत्साहाचे मूल्यमापण करण्याची गरज आहे. कारण लोकशाहीमध्ये जनतेचा कौल हा महत्त्वाचा असतो. प्रचलित राजकिय व्यवस्थेमध्ये बदल व्हावा म्हणून या यात्रेमध्ये प्रत्येकजण सहभागी होत आहे.

या पदयात्रेतील जनाधार हा येणार्‍या निवडणुकांतुन मतपेटीत परिवर्तीत होईल का? असा अनेकांना प्रश्न पडला आहे. निवडणुकीमध्ये जनतेला विकासाची प्रलोभणे, आर्थिक पुरवठा, दारु, मटण पुरविले जाते. तसेच विविध धार्मिक मुद्दे निर्माण करुन त्यांचे लक्ष विकासापासुन धार्मिक मुद्द्यांकडे वळविले जाते. त्यामुळे भावनिक होवून जनता प्रभावि जाहिरातबाजी करणार्‍या पक्षाले आपले मते. निवडणुकिचा प्रश्न त्या परिस्थितीवर सोडला तर आज जी खा. राहुल गांधी यांची लोकशाही अबाधीत ठेवण्याची निर्मळ भावना आहे. तीचा सर्वजन सकारात्मकतेने विचार करुन सर्व देशवासीयांच्या सर्वांगीण विकासासाठी राहुल गांधींना समर्थन देणे, काँग्रेस पक्षाला मजबुत करणे हेच योग्य असल्याचे जनतेच्या प्रचंड उत्साहावरुन दिसून येत आहे.

भैय्यासाहेब तुकाराम गोडबोले, रा. जवळा ता. लोहा जि. नांदेड, मो.९०११६३३८७४


Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी