हिमायतनगर, चांदराव वानखेडे। तालुक्यातील मौजे पळसपुर गावांमध्ये जंगली कोल्ह्यांचा फार मोठ्या प्रमाणात ञास वाढत चाललेला आहे. काही कोल्हे पिसाळलेली झाले आहे गावांमधील अनेक पाळीव प्राण्यांना ती चावा घेत आहे. त्यामध्ये गाई, म्हशी आणि बैल मृत्युमुखी पडत आहेत. तरीसुद्धा वन विभाग झोपेची सोंग घेऊन पाहत आहे. पिसाळलेल्या कोल्ह्याने चावा घेवून मरण पावले पशुच्या शेतकरी पालकांना वनविभागाने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी एका निवेदनाद्वारे शेतकऱ्यांनी वनविभागाकडे केली आहे.
अगोदरच पळसपुर गावांतील शेतकरी यंदाच्या खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे व नदीच्या पुराने नुकसानित आले आहेत. आता नवीन संकट शेतकऱ्यांवर येत आहे. दिनांक 11नोव्हेंबर रोजी विठ्ठलराव विश्वनाथ वानखेडे यांचा बैल नेहमी प्रमाणे बांधून असताना एका पिसाळलेल्या कोल्हायाने बैलांना मागील भागात चावा घेतला तेथील शेतात काम करणाऱ्या शेतातील काही शेतकऱ्यांनी पिसाळलेल्या अवस्थेत असलेल्या कोल्हाला हुसकावून लावले आणि त्यामध्ये पशुवैद्यकीय अधिकारी यांचे कडे उपचार केले. पण त्यात 13 नोव्हबर सकाळी 8 वाजता मुत्यु पावला वन विभाग कळविले त्या दिवशी रविवार होता.
गावातील शेतकऱ्यांचे पशुधनाची सुरक्षिततेची नाही यामुळे ग्रामपंचायतने पशुपालक यांचे नुकसान भरपाई देण्यासाठी ठराव मंजूर करण्यात आला व ते ठराव वनविभागाला दिला आहे. शेतकरी विठ्ठलराव विश्वनाथ वानखेडे यांनी तक्रार अर्ज व ग्रामपंचायत पिसाळलेल्या कोल्हायाने पळसपुर गावांतील जनावरे चावा घेऊन मरण पावले आहेत. त्यासाठी वनविभागाला संबंधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. त्यामध्ये बाबुराव शिरफुले यांचा बैल, सुभाषराव वानखेडे यांची म्हैस, विमलबाई वाडेकर यांची गाय, तर विठ्ठलराव वानखेडे यांचा बैल कोल्हाने चावा घेऊन मरण पावले आहेत. पळसपुर येथील पशुधन धोक्यात आले आहे शेतकऱ्या मध्ये दहशत निर्माण झाली आहे त्यामुळे पशुपालक यांना वनविभागाने शेतकऱ्यांना आर्थिक मदतीचा हात पुढे करावा कारण शेतकरी हा अडचणीत आहे..
पळसपुर गावांतील पिसाळलेल्या कोल्हाचा काही तरी बंदोबस्त करण्यासाठी वनविभागाने तत्परतेने पाऊले उचलावीत नाही तर पळसपुर येथील पशुधन वाचणार नाही.. हिमायतनगर तालुक्यातील तिसऱ्या क्रमांकावर पशुधन संख्या आहे ते वाचविण्यासाठी ,वनविभागाने पशुवैद्यकीय विभागाने, पशुप्रेमी, प्राणी छळ समितीने सर्वांनी सहकार्य करावे आणि पळसपुर येथील पशुधन वाचवावे.