सिमरन दिवस कार्यक्रमाच्या माध्यमाने मानवतेच्या कल्याणाचे लक्ष्य : रवींद्रसिंघ मोदी -NNL


नांदेड।
नांदेडच्या गुरुद्वारात मागील दीड दशकापासून सतत साजरा होत असलेल्या सिमरन दिवस कार्यक्रमाने जगातील मानवांच्या कल्याणासाठी सामूहिक प्रार्थना केली जाते. या कार्यक्रमाचे स्फुरण जगभर पसरावें अशी भावना पत्रकार रवींद्रसिंघ मोदी यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात व्यक्त करण्यात आली आहे. 

रवींद्रसिंघ मोदी यांनी पुढे मनोगत व्यक्त करतांना माहिती दिली की, नांदेडच्या गुरुद्वारा तखत सचखंड हजुरसाहेब येथे दरवर्षी प्रमाणे यंदा देखील ता. 15 नोव्हेंबर रोजी दुपारी 4 ते 4.45 दरम्यान विश्वशांतिच्या उद्देश्याने सिमरन दिवस सामूहिक जाप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून जगातील मानवतेच्या कल्याणासाठी सामूहिक जाप व प्रार्थना केली जाते. सुमारे पंधरा वर्षांपूर्वी सन 2007 मध्ये श्री गुरु ग्रन्थ साहिब गुरुतागद्दी त्रिशताब्दी कार्यक्रमाच्या प्रचार - प्रसार उद्देश्याने जागृती यात्रा काढण्यात आली होती. तत्कालीन गुरुद्वारा प्रशासक डॉ परविंदरसिंघ पसरीचा यांच्या पुढाकाराने त्यावेळी यात्रेच्या प्रस्थानाच्या वेळी सिमरन दिवस कार्यक्रम आकारात आले होते. नंतर सिमरन दिवस हा पारंपरिक स्वरुपात येथे स्वीकारण्यात आला. 


या वर्षीही सिमरन दिवसाचे जाप व अरदास करण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे संचालन गुरुद्वाराचे जत्थेदार संतबाबा कुलवंतसिंघजी आणि पंजप्यारे साहिबान करणार आहेत. यावेळी संतबाबा नरिंदरसिंघजी कारसेवा वाले, संतबाबा बलविंदरसिंघजी कारसेवावाले आणि संत महात्मा यांची उपस्थिती राहणार आहे. तसेच स्थानीक समाजाच्या प्रतिष्ठित नागरिकांसह हजारों च्या संख्येत भाविकांची उपस्थिती राहणार आहे. 

नांदेडच्या गुरुद्वारात दरवर्षी सिमरन दिवस साजरा करण्यात येतो व त्याच वेळी समस्त जगात देखील सामूहिक जाप मध्ये सर्वजण सहभागी होतात. या जगात शांतता नांदावी, बंधुत्व व एकता प्रस्थापित व्हावी. सर्व धर्मांनी एकमेकांशी सलोख्याने वागावे व मानवता वृन्दिगत व्हावी अशी प्रार्थना यावेळी केली जाते. तत्पूर्वी 15 मिनिटासाठी मूलमंत्राचे पाठ केले जाते. कार्यक्रमाउपरान्त भव्य लंगर प्रसाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सर्वधर्मीय भाविकांनी उपस्थित राहावे असे आवाहन गुरुद्वारा बोर्डातर्फे करण्यात आले आहे. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी