निवडणूक कार्यालयाचे उदघाटन; अभिषेक जोशींची उमेदवारी जाहीर
पुणे| सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ सिनेट निवडणुकीच्या रिंगणात हिंदू महासंघ दाखल झाला असून अभिषेक जोशी(पुणे) यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.नाशिक आणि नगर मधील कार्यालयापाठोपाठ बाजीराव रस्ता(पुणे) येथील कार्यालयाचे उदघाटन सोमवार,दि १४ नोव्हेंबर रोजी करण्यात आले. हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे,उमेदवार अभिषेक जोशी यांच्या उपस्थितीत पुणे कार्यालयाचे उदघाटन करण्यात आले. पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
'खुल्या प्रवर्गाचा आवाज आपण पुणे विद्यापीठात मांडणार असून व्यवसायाभिमुख कोर्सस सुरु करण्यावर आमचा भर असेल', असे या प्रसंगी बोलताना श्री जोशी यांनी सांगितले. 'बँका, कॉलेज, कंपनी, सरकारी कार्यालय येथील मतदारांची आम्ही भेटी घेत असून आरक्षणा बाहेर असलेल्या समाज सुद्धा पाठिंबा देत आहे', असे अध्यक्ष आनंद दवे यांनी या प्रसंगी सांगितले.आमच्या नाशिक आणि नगर मधील कार्यालये आणि पदाधिकारी सुद्धा आमच्या बरोबर कार्य करत असल्याचेही त्यांनी या प्रसंगी सांगितले.