नविन नांदेड। नांदेड दक्षिण वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आगामी नांदेड शहर महानगर पालिकेच्या निवडणूक विषयी पुर्ण अहवाल व वार्ड कार्यकारिणी,बुथ बांधणी आदी सविस्तर माहिती मुंबई येथे प्रदेश अध्यक्षा रेखा ठाकूर यांच्या कडे महानगर दक्षिण अध्यक्ष विठ्ठल गायकवाड व पदाधिकाऱ्यांनी सुपुर्द केला.
दि. 18 नोव्हेंबर 22 रोजी वंचित बहुजन आघाडी नांदेड महानगर च्या वतीने बूथ बांधणी, वॉर्ड कार्यकारणी,प्रभाग निहाय सूक्ष्म आगामी महापालिकेच्या निवडणूक विषयी पूर्ण माहिती चा कार्य अहवाल वंचित बहुजन आघाडी च्या प्रदेशाध्यक्षा आदरणीय रेखाताई ठाकूर यांना पक्षाचे केंद्रीय कार्यालय मुबंई येथे भेट घेऊन सादर करण्यात आला या वेळी रेखाताई ठाकूर यांनी अनेक बाबीवर आम्हाला सूचना केल्या यावेळी वंचित बहुजन आघाडी नांदेड दक्षिण महानगर अध्यक्ष विठ्ठल गायकवाड, महानगर महासचिव अमृत नरंगलकर सह कार्यलईन सचिव सुरेंद्र बनसोडे, दीपक पगारे, उपस्थित होते.