ग्रामविकास अधिकारी,विस्तार अ.गटविकास अधिकारि यांच्या बैठकित दिव्यांगाच्या विविध मागण्या -NNL

संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे यांनी लक्ष केंद्रीत करून चर्च घडुन आणली

बिलोली। दिव्यांगाच्या प्रबलित मागण्यासाठी पंचायत समिती सभागृह बिलोली येथे  गटविकास अधिकारि बिलोली यांनी ग्रामविकास अधिकारी, वि.अ, दिव्यांग संघटनेचे संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरेच्या शिष्टमंडळा सोबत बैठक घेऊन अनेक विषयावर चर्चा करून ग्रामपंचायतचा किती गावात दिव्यांग निधी वाटप करण्यात आला असे विचारले असता फक्त चौदा गावात निधी वाटप झाल्याचे बैठकित कळाले. तर विस्तार अधिकारी यांनी सर्व ग्रामसेवक यांना अनेक वेळा दिव्यांग निधी देण्याचे आदेश देऊन आपण का देत नाहि असा प्रश्न ऊपस्थित करून ग्रामसेवकानी आठ दिवसात पुर्ण तालुक्यात दिव्यांग निधी वाटप करण्याचे आदेश दिले.

दिव्यांग वयोवृध्दासाठी साहित्य मोजमाप २०१९ साली घेऊन तिन वर्षापासुन साहित्य का वाटप करण्यात आले नाहि किती साहित्य वाटप झाले किती शिल्लक आहे असे डाकोरे यांनी विचारले असता आम्हि वरीष्ठाकडे माहिती देतो असे ऊर्मट ऊत्तर विस्तार अधिकारी वाघ सरानी दिले तेव्हा डाकोरे यांनी अनेक प्रश्नासाठी तेरा निवेदण व धरने आंदोलन करुन साधे ऊतर मिळत नाहि न्याय कधी मिळनार असे विचारले असता निवेदण का गटविकास अधिकारी खिशात घेऊन जातात काय असे ऊतर विस्तार अधिकारी वाघ यांनी दिले  व बैठकितुन बाहेर गेले.


ग्राम पंचायत, हद्दीतील शासकीय व निमशासकीय कार्यालयात व मुख्य ठिकाणी दिव्यांगाला व्यवसाय करिता 200 स्क्वेअर फुट जागा उपलब्ध करून स्वयं रोजगारासाठी जागा द्यावे असे डाकोरे सांगताच गटविकास अधिकारी यांनी  दिव्यांगाचे निवेदन आल्यास जागा ऊपलब्ध असल्यास त्वरीत द्यावे नसेल तर जागा नाहि असे कळवावे असे आदेश दिले. अशा प्रलबित सात मांगन्या संदर्भात सर्व ग्रामविकास अधिकारी,यांनी चर्चेत भाग घेऊन सविस्तर चर्चा झाली मा. गटविकास अधिकारी यांनी सर्व विषयाबदल सर्वाना आठ दिवसात अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले.

या बैठकित सर्व ग्रामसेवक, विस्तार अधिकारी,गटविकास अधिकारी, दिव्यांग, वृध्द,निराधार मित्र मंडळ महाराष्ट. संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे,ता. अध्यक्ष बालाजी होनपारखे, संतोष नरवाडे,किसनराव,चुनावारं, शंकर करपे,विठ्ठल डोंगरे,गोपाळ अडबलवार, शंकर करपे, नारायण ठोमसे,गंगाधर कल्यापुरकर इतर सर्व दिव्यांग व्यक्ती यावेळी उपस्थित होते....

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी