नांदेड| देशामध्ये सुरू असलेल्या बेकायदेशीर धर्मांतरण तसेच लव्ह जिहाद सारख्या षडयंत्रांना आळा घालण्यासाठी कठोर कायदा बनवावा, या प्रमुख मागणीसाठी राजस्थानी मित्र परिवार, नांदेडच्या वतीने जिल्हाधिका-यांमार्फत राष्ट्रपतींना निवेदन पाठविण्यात आले.
संपूर्ण देशामध्ये लव्ह जिहाद विरोधी कायदा बनवून यामध्ये दोषी आढणा-यावर कठोर कारवाईची तरतुद करून ही सर्व प्रकरणे हाताळण्याकरिता स्पेशल कोर्टाची नियुक्ती करण्यात यावी, कोणत्याही प्रकारची प्रलोभणे, धमकावणे अथवा फसवणुक इत्यादी प्रकारे सुरू असलेले धर्मांतरण रोखण्याकरिता कायदा करून असे बेकायदेशीर धर्मातरण करण्यावर बंदी आणावी, त्याच प्रमाणे संपूर्ण देशामध्ये गोवंश हत्या बंदी कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी होण्याकरिता स्वतंत्र विभाग स्थापन करून त्यांच्या मार्फत सदर कायद्याची अंमलबजावणी करण्यात यावी, दिल्ली येथील श्रध्दा वलकर हिचा आफताब पुनावाला याने केलेल्या निघृण हत्येचा खटला जलद गतीने न्यायालयात चालवून सदर विकृत क्रुरकर्म्यास फाशी द्यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.