आपली सुरक्षा हिच आपल्या परिवाराची सुरक्षा - आज जागतिक एड्स दिन विशेष -NNL


१ डिसेंबर १९८८ पासून दरवर्षी जागतिक एड्स दिन साजरा केला जातो. एडस हा रोग एचआयव्ही या जिवघेण्या वायरस मुळे होतो. एड्स हा असा आजार आहे. ज्याच्यावर अद्याप कोणताही प्रभावी उपचार वैज्ञानिकांना सापडलेला नाही. यापासून स्वतःचा बचाव करणं,जागरुकता हा या आजारावररील एकमेव उपचार आहे. या आजारासंबंधी जगभर जागरुकता वाढविणे,जनजागृती करणे,प्रचार प्रसार करण्यासाठी या भयानक संसर्गाच्या विरोधात लढ्यात सहभागी होण्यासाठी हा दिन साजरा केला जातो.

एड्स कसा पसरतो:- एड्स हा फक्त लैंगिक संबंध ठेवल्यानेच होतो असे नाही तर ज्या व्यक्तिस हा रोग झालाय त्या व्यक्तींच रक्त जर तुमच्या शरीरात गेल तरी तो होऊ शकतो.किंवा त्या व्यक्तिला टोचण्यात आलेली सुई जरी दुसऱ्यास टोचली गेली तरी हा रोग होऊ शकतो.एड्स झालेल्या गर्भवती महिलेकडून तिला होणाऱ्या मुलाला पण होऊ शकतो.

लक्षणे:- तोंडात पांढरे ठिपके पडणे,थकवा येणे,वजनात घट होणे, उलटी होणे,घाम येणे,तीव्र ताप येणे,सांधे,डोके दुखणे,थकवा येणे,सतत खोकला येणे,घसा,मांड्या,बगलेच्या लसिका ग्रंथीना सुज येणे,गुठळ्या,शरीरात खाज होणे,सुटणे,भाजणे यासारख्या समस्या तसेच न्युमोनीया,क्षयरोग,त्वचारोग,कर्करोग ईत्यादींचा समावेश एड्सच्या लक्षणांमध्ये होतो.अशी काहीही लक्षणे जाणवली तर एखाद्या व्यक्तींने डाॕक्टरांचा,तज्ज्ञांचा सल्ला घेऊन त्वरित तपासणी केली पाहिजे.

एड्स पासून बचाव:- एचआयव्ही पासून बचाव करण्यासाठी जागरूकता अत्यंत आवश्यकता आहे.एखाद्या व्यक्तिला ईंजेक्शन देण्यासाठी वापरलेली सुई पुन्हा वापरु नये,सुरक्षित लैंगिक संबंध ठेवावे,ज्याला हा रोग झालाय त्या व्यक्तिंच रक्त जर तुमच्या शरीरात गेले तरी तो होऊ शकतो.एखाद्या व्यक्तिने वापरलेले ब्लेड शेविंगसाठी पुन्हा वापरु नये.

भारतात १९८६ साली चेन्नई मध्ये तर  १९८७ साली मुंबईत एड्सचा पहिला रुग्ण आढळला तेंव्हापासून हा रोग भारतात हळुहळु पसरत आहे.१९९० साली नॕशनल एड्स कंट्रोल आॕर्गनायझेशन ची स्थापना करण्यात आली.या आॕर्गनायझेशनचा मुख्य उद्देश एड्स बाधित रूग्णांची संख्या वाढवण्यापासून रोखणे,त्यापासून होणारे मृत्युदर कमी करणे हा होय.भारत सरकारच्या मार्गदर्शनाखाली देशातील आरोग्य विभाग खुप चांगल काम करित आहे.

तसेच या रोगाबाबत अधिक जनजागृती व्हावी यासाठी आरोग्य विभाग,शासकिय रुग्णांलयाच्या वतीने दरवर्षी १ डिसेंबर ते ७ डिसेंबर सप्ताह साजरा केला जातो.यामध्ये रॕली,डाॕक्टर व तज्ज्ञांकडून मार्गदर्शन, कार्यशाळाचे आयोजन करण्यात येते.यासह ईतर सर्व शासकिय कार्यालये, यंञणा, महाविद्यालय विविध सामाजिक संस्था यांनीही वेळोवेळी वेगवेगळे उपाययोजना,प्रकल्प राबवित असल्यामुळे वाढणाऱ्या एड्सच्या  रुग्णांच्या संख्येत झपाट्याने घट होत आहे.

....मोहसीन खान, अध्यक्ष, अल ईम्रान प्रतिष्ठान,बिलोली, नांदेड.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी