इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान हा विश्वचषकाचा अंतिम सामना न दाखवण्याचा निर्णय -NNL


नांदेड|
सर्व भारतीयांचे लक्ष लागलेल्या इंग्लंड विरुद्धच्या क्रिकेट सामन्यात भारताचा दारुण पराभव झाल्यामुळे निराश होऊन रविवारी इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान हा विश्वचषकाचा अंतिम सामना न दाखवण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती संयोजक धर्मभूषण ॲड.दिलीप ठाकूर व सुरेश लोट यांनी दिली आहे.

भाजपा नांदेड महानगर व कलामंदिर ट्रस्ट तर्फे विश्वचषकातील सर्व सामने कलामंदिरच्या सभागृहात मोठ्या पडद्यावर दाखवण्यात आले होते. १९९९ पासून दिलीप ठाकूर हे क्रिकेट विश्वचषकातील भारताचे सर्व क्रिकेट सामने मोठ्या पडद्यावर निशुल्क दाखवत असतात. यावर्षीचा उपांत्य फेरीच्या सामन्याचे उद्घाटन नांदेडभूषण सरदार नवनिहालसिंग जहागीरदार यांच्या हस्ते झाले. 

यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रवीण साले, जिल्हा उपाध्यक्ष अनिलसिंह हजारी, अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेश कार्यकारणी सदस्य अभिषेक सौदे, सहकार आघाडीचे जिल्हाध्यक्ष संतोष परळीकर, अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष साहेबराव गायकवाड, अल्पसंख्यांक मोर्चा चे जिल्हाध्यक्ष अकबर खान पठाण, शिख सेल जिल्हाध्यक्ष कृपालसिंग हुजूरिया, विमुक्त मोर्चाचे अध्यक्ष नरेंद्रसिंह बैस, कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष अनिल जगताप दक्षिण भारतीय आघाडीचे जिल्हाध्यक्ष अनिल गाजूला,जिल्हा चिटणीस सरदार चंचलसिंग जट ,प्रतिष्ठित व्यापारी गणेशसिंह चव्हाण व नवज्योतसिंग जहागीरदार, बिरबल यादव यांची प्रमुख उपस्थिती होती.

खचाखच भरलेल्या सभागृहात भारताची फलंदाजी सुरू असताना प्रचंड उत्साह होता. परंतु इंग्रजांनी धोबीपछाड दिल्यामुळे क्रीडा रसिकांचा रसभंग झाला. त्यापूर्वीच्या भारत विरुद्ध झिम्बाब्वे या सामन्याचे प्रक्षेपणाची सुरुवात नांदेड भूषण ॲड. मिलिंद एकताटे यांच्या हस्ते करण्यात आली होती. या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान नगरसेवक राजू गोरे यांनी भूषविले.यावेळी व्यासपीठावर जिल्हा चिटणीस ॲड. अभिलाष नाईक, क्षितिज जाधव, प्रेम फेरवानी,अनिल गाजूला, भाजपा सक्रिय सदस्य कामाजी सरोदे यांची प्रमुख उपस्थिती होती. या सामन्याचा विजय शेकडो प्रेषकांनी जल्लोषात साजरा केला. गेल्या पंधरवड्यात कलामंदिर मधील प्रक्षेपणाचा मनमुराद आनंद क्रीडा रसिकांनी लुटला होता. तरुणांच्या प्रचंड उपस्थितीमुळे जागा कमी पडत होती. हजारो क्रीडा रसिकांनी या थेट प्रक्षेपणाचा लाभ घेतला. 

परंतु अंतिम फेरी भारताला गाठता आली नसल्यामुळे नाईलाजास्तव अंतिम सामना न दाखवण्याचा निर्णय घेण्यात आला. हा उपक्रम दाखवण्यासाठी शिवा लोट, संतोष भारती,शिवचरण लोट, प्रदीपसिंह हजारी, विलास वाडेकर, सदाशिव कंधारे, महेंद्र शिंदे, कपिल यादव,आशिष मेश्राम, प्रवीण सुनेवाड, जनार्धन वाकोडीकर, करण जाधव, विलास वाडेकर,सदाशिव कंधारे, सुनील वाघमारे, आकाश गायकवाड, विलास जोगदंड, विजय वाडेकर यांनी परिश्रम घेतले. गेल्या 23 वर्षापासून क्रिकेट विश्व चषकातील भारताचे सामने मोठ्या पडद्यावर निशुल्क दाखवण्याची परंपरा यावेळी ही दिलीप ठाकूर यांनी कायम ठेवल्याबद्दल त्यांचे क्रीडा रसिक कौतुक करत आहेत. 


Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी