हरवलेल्या 7,76,064/- रुपयाचे ५६ अॅण्डरॉईड मोबाईल हस्तगत; स्थानिक गुन्हे शाखा, नांदेडची कार्यवाही


नांदेड।
जिल्हयात सार्वजनीक ठिकाणाहुन व बाजारातुन महागडे मोबाईल गहाळ झालेल्या मोबाईलचा शोध घेण्याकरीता मा. पोलीस अधिक्षक, नांदेड यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक व्दारकादास चिखलीकर यांना आदेशीत केले होते. पो. नि. स्थागुशा , नांदेड यानी स्था.गु.शा. येथील पोलीस अमलदाराचे एक पथक तयार करुन मिसींग मधील मोबाईलचा शोध घेणे चालु केले होते. 

स्था.गु.शा. नांदेड येथील पथकाने नांदेड शहरातील व जिल्हयातील गहाळ झालेल्या मोबाईल चा शोध वेगवेगळया ठिकाणी जावून नांदेड जिल्हातील एकूण 56 मोबाईल किमती 7,76,064/-रुपयाचे मोबाईल हस्तगत केले आहेत. संबंधीतानी सोबतचे यादीतील मोबाईलचे IMEI नंबरची खात्री करुन ज्यांचे मोबाईल आहेत त्यांनी घेवून जाण्याचे अव्हान पोलीस प्रशासना कडुन कण्यात येत आहे.

सदरची कारवाई ही मा. पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांचे मार्गदर्शनाखाली व्दारकादास चिखलीकर , पोलीस निरीक्षक , स्था. गु. शा. नांदेड, पोउपनि. दत्तात्रय काळे, गोविंद मुंडे, गंगाप्रसाद दळवी, पोलीस अंमलदार संजय केंद्रे, गंगाधर कदम, सुरेश घुगे, दशरथ जांभळीकर, सखाराम नवघरे, गणेश धुमाळ, विलास कदम, विठल शेळके ,बालाजी यादगीरवाड, पदमसिंह कांबळे, बालाजी तेलंग, गजानन बयनवाड, महेश बडगु, व सायबर सेलचे पोह/राजु सिटीकर, दिपक ओढणे यांनी पार पाडली असून सदर पथकाचे मा. पोलीस अधीक्षक साहेब यांनी कौतुक केले आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी