बिलोली। अंधअपंग यांच्या विषयी आस्था आणि आपुलकी असलेले बिलोली तालुक्यातील केसराळी येथील डॉक्टर मधुकर गायकवाड यांनी मुंबई येथे धकाधकीच्या जीवनातही वेळ काढून मदत करतानाचे चित्र बिलोलीवासीयांनी अनुभवले.
बिलोली तालुक्यातील प्रसिद्ध वक्त्या तसलीम पटेल यांचे राणी सावरगाव येथील नातेवाईक यांच्या अंध, अपंग प्रकरणात महत्त्वपूर्ण भूमिका घेऊन डॉ. मधुकर गायकवाड यांनी केलेली सहाय्याची व सल्ल्याची मदत अनेकांना आपुलकीची वाटून गेली.मुंबईत मराठवाड्याच्या आपुलकीचा जिव्हाळा दिसून आला.
बिलोली तालुक्यातील केसराली येथील रहिवासी असलेले डॉक्टर मधुकर गायकवाड सर्वसामान्यांचे डॉक्टर म्हणून बिलोली तालुक्यातील केसराळी भागात तर प्रसिद्ध आहेतच शिवाय मुंबईतही सामान्याचे डॉक्टर म्हणून आपली ओळख निर्माण केली. साधी राहणे आणि प्रगल्भ विचार असलेले डॉक्टर गायकवाड यांनी अंध आणि अपंगांना सल्ला व मदत करतानाचे चित्र बिलोली तालुक्यातील नागरिकांनी अनुभवले. बिलोली येथील प्रसिद्ध वक्त्या असलेल्या डॉ. तसलीम पटेल यांचे नातेवाईक असलेल्या राणी सावरगाव येथील युवकांना गायकवाड यांनी अत्यंत आस्था आणि आपुलकीने कुवत आणि क्षमतेप्रमाणे सहाय्य व सल्ला करतानाचे चित्र दिसून आले. धकाधकीच्या मुंबईत, मराठवाड्याच्या आपुलकीचा जिव्हाळा दिसून आला