हिमायतनगर। येथील प्रसिद्ध व्यापारी तथा रोजगार स्वयंरोजगार समितीचे जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण प्रकाशराव कोमावार यांनी टॉप मॉडेलची मारोती इर्टीगा गाडी खरेदी केली आहे. सदरील गाडी एका महिन्यात मिळावी म्हणून आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी प्रयत्न केल्याचे त्यांनी सांगितले.
गाडी उपलब्ध झाल्यानंतर मुंबई येथे आमदार जवळगावकर यांनी गाडीचे पूजन करून हिमायतनगर येथे गाडी रवाना केली असून, या ठिकाणी परमेश्वर मंदिर ट्रस्टचे उपाध्यक्ष महावीरचंद श्रीश्रीमाळ आणि मार्केट कमिटीचे माजी संचालक रफिक शेठ यांच्या हस्ते गाडीचे पूजन करून गाडी ऑन रोड काढण्यात आली आहे. नवीन गाडी घ्यायची असेल तर नांदेड येथे एका वर्षाचे वेटिंग करावी लागते, मात्र आमदार जवळगावकर आणि रफिक शेठ यांच्या प्रयत्नामुळे केवळ एका महिन्यात गाडी उपलब्ध झाल्याबद्दल प्रवीण अण्णा कोमावार यांनी त्यांचे आभार मानले आहेत.
तसेच गाडीच्या पूजनानंतर उपस्थित सर्वांना पेढा भरून आशीर्वाद घेतले यावेळी त्यांच्या कुटुंबीय सौ. सुरेखांबाई प्रकाशराव कोमावार, सौ. संगीताताई प्रवीण कोमावार, जनार्धन ताडेवाड, परमेश्वर मंदिराचे संचालक अनिल मादसवार, गजानन मुत्तलवाड, वज्रसूची न्यूजचे संपादक शुद्धोधन हनवते, पापा पार्डीकर, लिपिक भोयर गुरूजी, विजय दळवी, शिवाजी रामदीनवार, सदस्य व गावकरी उपस्थित होते.