अखिल वीरशैव लिंगायत महासंघाचा अभिनव उपक्रम
दिल्ली। दिल्लीच्या महाराष्ट्र सदन मधील कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त फराळ व भेटवस्तू देण्याचा अभिनव उपक्रम अखिल वीरशैव महासंघ व सोलापूरचे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांच्यावतीने राबवण्यात आला.
महाराष्ट्रातील अखिल वीरशैव लिंगायत महासंघाचे कार्याध्यक्ष डॉक्टर विजय जंगम हे सदोदित लोकहितवादी उपक्रम राबविण्यात सक्रिय सहभागी असतात. दिल्लीतील महाराष्ट्र सदनातील सर्व अधिकारी, कर्मचारी, सुरक्षारक्षक,सफाई कामगार सह कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त भेटवस्तू व फराळाचे वाटप डॉ.विजय जंगम यांनी २८ ॲाक्टोबर रोजी केले. ऊर्जा फाउंडेशनच्या माध्यमातून राबवलेल्या या उपक्रमामुळे महाराष्ट्र सदनात महाराष्ट्राची नवीन ओळख निर्माण झाली.सर्वांनी आनंदाने भेट वस्तू स्वीकारत अखिल वीरशैव लिंगायत महासंघाचे मनःपूर्वक आभार मानले.