शून्यातून विश्व निर्माण करणा-या स्वप्न पुरती वृत्तपत्र विक्रेता बचत गटाचे कार्य कौतुकास्पद -NNL


नविन नांदेड।
शुन्यातून विश्व निर्माण करून बचतगटाच्या माध्यमातून वृत्तपत्र विक्रेते यांना आर्थिक साह्य करणा-या स्वप्न पुरती वृत्तपत्र विक्रेता स्वयंसहाय्यता बचत गटाचे कार्य कौतुकास्पद असल्याचे दिवाळी निमित्ताने  वृत्तपत्र सभासद बांधवांना फराळाचे वाटप प्रसंगी मजुर फेडरेशन नांदेडचे अध्यक्ष लक्ष्मीकांत गोणे यांनी केले.

स्वप्नपुरती वृत्तपत्र विक्रेता स्वयं सहाय्यता बचत गट यांच्या वतीने दरवर्षी प्रमाणे याही अकराव्या वर्षी सदस्यांना दिवाळी निमित्ताने फराळाचे वाटप करण्यात आले. गेल्या ३ मार्च रोजी २०१२ रोजी  स्थापना केलेल्या या स्वप्न पुरती वृत्तपत्र विक्रेता स्वयं सहाय्यता बचत गट हा दरवर्षी वेगवेगळ्या ऊपकम राबवित असतो या मध्ये वृत्तपत्र विक्रेते सदस्य यांना प्रथम वर्षी पेपर वाटपासाठी कापडी पिशवी, प्रत्येक वर्षी फराळाचे वाटप , प्रत्येक सदस्याला भेट वस्तू,कोरोना काळात आर्थिक मदत देण्यात आल्याचे सांगुन सदस्या कडे कर्ज पोटी ६ लाख ५० हजार रुपये देण्यात आल्याचा सांगितले.

मजुर फेडरेशनचे अध्यक्ष लक्ष्मीकांत गोणे, प्रजावणीचे संपादक गोवर्धन बियाणी,नवीन नांदेड मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष रमेश ठाकूर,प्रजावाणीचे वितरण प्रमुख नासेर भाई, नांदेड जिल्हा वृत्तपत्र वितरक संघटनेचे सल्लागार चंद्रकांत घाटोळ ,छायाचित्रकार सांरग नेरलकर यांच्या सह मान्यवरांच्या उपस्थितीत दिवाळी सणाच्या निमित्ताने फराळाचे वाटप करण्यात आले. यावेळी गोवर्धन बियाणी यांनी बचत गटाच्या कौतुकास्पद कार्य असल्याचे सांगून दिवाळी निमित्ताने शुभेच्छा दिल्या तर नांदेड जिल्हा वृत्तपत्र वितरक संघटनेचे सल्लागार चंद्रकांत घाटोळ यांनी बचत गटाच्या माध्यमातून वृत्तपत्र विक्रेते यांना आर्थिक साह्य मुळे वृत्तपत्र विक्रेते यांना चालना मिळाल्याचे सांगितले.

ऊपसिथीत मान्यवरांच्या सत्कार शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.सूत्रसंचलन  अध्यक्ष बाबु जलदेवार,सचिव सत्यनारायण देवरकोंडा,पठाण खयुम,दिलीप सोनटक्के,व्यंकटेश अनलदास,संजय गोणे,साईनाथ पसलवाड,शंकर हुसे,प्रभुसिंग ठाकूर ₹, अवधुत पसलवाड, दस्त गिर पठाण,प्रदीप गवारे व वृत्तपत्र विक्रेते ऊपसिथीत होते. आभार गणेश वडगावकर यांनी मानले.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी