जास्त प्रवासी भाडे आकारणाऱ्या ट्रॅव्हल्स विरुद्ध तक्रारी नोंदवा -NNL


नांदेड|
दिवाळी व इतर सणांच्या कालावधीत प्रवासी मोठया प्रमाणात गावी येत व जात असतात. अशा कालावधीत शासनाने निश्चित केलेल्या भाडेदरापेक्षा अधिक भाडे प्रवासी बस धारकामार्फत घेत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. 

26 ऑक्टोबर 2021 रोजीच्या राज्य महामंडळाच्या भाडेदराच्या तुलनेत कंत्राटी परवाना वाहनांना कि.मी.प्रमाणे भाडे निश्चित करण्यात आले आहे. कंत्राटी वाहतुकदार प्रवासी भाडयापेक्षा जास्त भाडे आकारणी केल्यास याबाबत प्रादेशिक परिवहन अधिकारी विभागाच्या ईमेल dycommr.enf2@gmail.com व rto.26-mh@gov.in वर तक्रार नोंदवावी. त्यामध्ये आपले नावे, मोबाईल क्रमांक, तिकीट, प्रवासाचा तपशील याची माहिती देण्यात यावी, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अविनाश राऊत यांनी केले आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी