लोहा| अतिवृष्टी व पुराच्या पावसामुळे पीक नुकसानीत बाधित शेतकऱ्यांना राज्य सरकारने यंदा वाढीव अनुदान जाहीर केले .तीन हेक्टर पर्यंत १३हजार ६००रुपये मिळणार आहेत. यंदा दिवाळीत लोहा तालुक्यातील १२६ गावातील ७३ हजार १८७ शेतकऱ्यांना थेट त्यांच्या बँक खात्यात एक रक्कमी अनुदान जमा होत आहे. ६० कोटी तीन लक्ष २३ हजार ९९२ रुपयांचा धनादेश लोह्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुख्य शाखेत जमा करण्यात आला .त्यामुळे यंदा तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना एक रककमी अनुदान वाटप करण्याचा निर्णय घेतला. तीन हेक्टर पर्यंत १३ हजार सहाशे रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला. जून ते ऑगस्ट या काळात झालेली अतिवृष्टी व पूर परिस्थिती यामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले. त्याचे सर्व्हे करून शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी विरोधक व सत्ताधारी पक्षाच्या वतीने करण्यात आली होती. तहसीलदार यांना विविध राजकीय व सामाजिक संघटना यांनीही निवेदने दिली होती. जिल्ह्याचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी दिवाळी काळात शेतकऱ्याच्या बँक खात्यात अनुदान पडावे यासाठी बँकेने नियोजन करण्याचे निर्देशित केले आहे असे सांगण्यात आले. आ श्यामसुंदर शिंदे, आ मोहनअण्णा हंबर्डे यांनी वेळेत अनुदानासाठी संबंधितांना वेळेवेळी आदेशीत केले होते.
लोहा तालुक्यातील उपरोक्त काळात अतिवृष्टी व पुरपरीस्थी मुळे मोठयाप्रमाणात नुकसान झाले होते त्यांाचे पंचनामे केले ७३ हजार १८७ शेतक-यांच्याचे ४४ हजार ६९५ हेक्टर जमिनीतील पीक बाधित झाले त्याच्या बँक खात्यात मध्ये थेट ६० कोटी ०३ लक्ष चौवीस हजार रुपये जमा होणार आहेत. तालुक्यातील सर्व म्हणजे १२६ गावातील पात्र शेतकरी लाभार्थ्याच्या यादया बॅकेना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे यदाची दिवाळी गोंड होणार आहे. तहसीलदार व्यकंटेश मुंडे यांनी त्याचे सर्व अधिकारी कर्मचारी यांनी अतिवृष्टी व पुरपरीस्थी्मुळे शेतीपीकाचे नुकसान झालेल्या बाधीत क्षेत्राचे सर्व्हेेशन वेळेत करण्याचे केले होते. तलाठी यांनी गावोगावी जाऊन अतिवृष्टीचे नुकसान झालेले शेतीचे सर्व्हेशन केले ४४ हजार ६९५ हैक्टर क्षेत्र बाधीत झाले.
६० कोटी ०३ लक्ष चौवीस हजार रुपये निधी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅके लोहा शाखेत जमा करण्यात आला. त्या त्या भागातील गाव निहाय यादया बँकेकडे दिल्या आहेत. त्यामुळे यदा शेतक-याना दिवाळीत शासकीय मदत मिळणार आहे. शेतकऱ्यांची दिवाळी आंनदात साजरी होणार आहे. उपाविभागीय अधिकारी कंधार शरद मंडलीक व तहसीलदार व्यकंटेश मुंडे यांच्या मार्गदर्शना खाली नायब तहसीलदार अशोक मोकले, नायब तहसीलदार बोरगावकर, नायब तहसीलदार संजय भोसीकर, अव्वल कारकुन बी पी बडवणे, महसुल सहा.गोविंद पटणे यांनी वेळेत यादया तयार केल्या. त्यामुळे यदा दिवाळीत शेतक-यांना अनुदान मिळणार आहे.