शिकाऊ उमेदवारी भरती मेळाव्यात 134 प्रशिक्षणार्थ्यांची निवड -NNL


नांदेड|
औद्योगिक प्रशिक्षण संस्था व बीटी आरआय नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने प्रधानमंत्री राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी भरती मेळाव्याचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. या मेळाव्यात विविध आस्थापनेतील विविध व्यवसायाच्या 708 जागा उपलब्ध होत्या. उपस्थित 262 प्रशिक्षणार्थ्यां पैकी 134 प्रशिक्षणार्थ्यांची निवड करण्यात आली आहे.

या मेळाव्यात ऋचा इंजिनिअरिंग, बडवे इंजिनिअरिंग प्रा. लिमिटेड, इंडुरन्स इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड, एन.आर.बी बेरिंग्स, क्लाड मेटल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, धनंजय मेटल क्राफ्ट प्रायव्हेट लिमिटेड औरंगाबाद इ. नामांकित कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी उपस्थित प्रशिक्षणार्थ्यांना अप्रेंटिसशिप विषयक सविस्तर माहिती देवून कंपनी पॉलीसी, स्टायपेंड इत्यादी बाबी सविस्तरपणे सांगण्यात आल्या.

यावेळी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे उप प्राचार्य एस.एस.परघणे, सहाय्यक प्रशिक्षणार्थी सल्लागार पी.के अन्नपुर्णे, प्रबंधक श्रीमती राठोड, कनिष्ठ प्रशिक्षणार्थी सल्लागार एन.एन.सामाले, गटनिदेशक श्री. खानजोडे, श्री. भोसीकर तथा कंपनीचे प्रतिनिधी सचिन केदारे, अक्षय कुबेर, रितेश शुक्ला यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सुत्र संचालन एस.एम.राका यांनी केले. संस्थेतील एनएसएस प्रमुख       श्री. कलंबरकर, श्री. उदबुके, श्री. केदारे, श्री. चुनपवार, श्री. बनाटे, श्री. गिरी, श्री. हक्कानी , श्री. पुंडगे आणि श्री. हिंगोले यांनी सहकार्य केले. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी