देगाव चाळ येथील प्रज्ञा करुणा विहारात ६६ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात
नांदेड| महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी १९५६ ला नागपूर येथे आपल्या लाखो अनुयायांसोबत बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार प्रदान करणारी ही ऐतिहासिक धम्मक्रांती होती. अनेक बौद्ध राष्ट्रांनी या घटनेची नोंद घेतली. यामुळे भारत देशात रसातळाला गेलेल्या बौद्ध धम्माचे पुनरुज्जीवन केले असे प्रतिपादन बुद्धीष्ट इंटरनॅशनल नेटवर्क परभणी जिल्हाध्यक्षा प्रा. रेखाताई ढगे यांनी केले.
त्या ६६ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होत्या. यावेळी इंजि. पी. एन. पडघणे, इंजि. डी. डी. भालेराव, साहित्यिक समीक्षक प्रज्ञाधर ढवळे, स्तंभलेखक भैय्यासाहेब गोडबोले, शिवाजी सावते, प्रकाश ढवळे , नागोराव डोंगरे, थोरात बंधू, संयोजक सुभाष लोखंडे आदींची उपस्थिती होती. शहरातील देगाव चाळ येथील प्रज्ञा करुणा विहारात रमामाता महिला मंडळाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पहिल्या सत्रात पी. एन. पडघणे यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले. तथागत गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे दीप धूप आणि पुष्प पूजन करून अभिवादन करण्यात आले.
त्रीसरण, पंचशील, त्रीरत्न वंदना, भीमस्मरण गाथा पठणानंतर सप्तरंगी साहित्य मंडळाची ६२ वी काव्य पौर्णिमा साजरी झाली. त्यात शिवाजी सावते, प्रकाश ढवळे , नागोराव डोंगरे, थोरात बंधू, काव्य पौर्णिमेचे संकल्पनक प्रज्ञाधर ढवळे यांनी सहभाग घेतला. त्यानंतर मान्यवरांची समयोचित भाषणे झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रज्ञाधर ढवळे यांनी केले तर आभार सुभाष लोखंडे यांनी मानले. दरम्यान, 'बुद्ध आणि त्यांचा धम्म' या ग्रंथाचे वाचक अॅड. माया राजभोज आणि नामदेव दिपके यांचा आहेर देऊन सत्कार करण्यात आला. राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याबद्दल सुभाष लोखंडे यांचा महिला मंडळाच्या वतीने सपत्नीक सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात सायंकाळी आंबेडकरी गायक क्रांती कुमार पंडित यांच्या आर्केस्ट्राचा बुद्ध भीम गीत गायनाचा कार्यक्रम संपन्न झाला. प्रकाश नवरे दगडगावकर, रवी पंडित, विजय गोडबोले, डी डी भालेराव, गयाताई कोकरे, डी एम निखाते, भीमराव हटकर सदाशिव गच्चे, हिरामण वाघमारे, साहेबराव पुंडगे, अनिल थोरात, सतीश हिंगोले, सुरेश सावळे, उमेश बाऱ्हाटे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जळबाजी थोरात, धोंडीबा लांडगे, अॅड. अनिल सदावर्ते माणिकराव हिंगोले, नामदेव दिपके, अनिल निखाते, गणेश हटकर, अशोक खाडे, मंगेश खाडे, विजय पंडित, नामदेव गोडबोले, देवानंद नरवाडे, वसंत हाटकर, रमेश सातोरे, संतोष नरवाडे, सुनील कोकरे, सुभाष नरवाडे, मिलिंद हिंगोले, अमृतराव पवार, सिद्धार्थ हाटकर, विपिन हिंगोले, अरविंद ढगे, संघपाल गोडबोले, रमा माता महिला मंडळाच्या गयाबाई हाटकर गिरजाबाई नवघडे, भिमाबाई हाटकर, शोभाबाई गोडबोले, पंचफुलाबाई कोकरे, रेणुकाबाई गजभारे, सखुबाई हिंगोले, महामाया येवले, शेषाबाई धुळे, पद्मिनीबाई गोडबोले, निर्मलाबाई पंडित, रेखाबाई हिंगोले, सविताबाई नांदेडकर, शिल्पा लोखंडे, सुमनबाई वाघमारे, नानाबाई निखाते, अनिताबाई नरवाडे, आम्रपाली कोकरे भागीरथाबाई थोरात आदींनी परिश्रम घेतले.