अर्धापूर| तालुक्यातील कामठा ( बु) येथे महिलांचा विरोध झुगारून खुलेआम मटका बहाद्दर सबंधीतांना हाताशी धरुन अनेक महिन्यांपासून मटका चालवितात,त्या मटका बुकीवर अखेर नांदेडच्या गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलीसांनी सापळा रचून सोमवारी धाड टाकली,या धाडीत ५ हजार व जुगाराचे साहित्य पोलीसांनी जप्त केले असून दोन आरोपींना अटक केली आहे.
अर्धापूर तालुक्यातील कामठा ( बु) येथे मुख्य रस्त्यावर महिलांचा विरोध असतांना काहींना हाताशी धरुन अनेक महिन्यांपासून मटका सुरू आहे, याविषयी कोणीही जाहीर बोलायला धजावत नाही, यापुर्वीही येथे मटकाबुकीवर धाड टाकण्यात आली,पण कालांतराने येथे नेहमी अर्धापूर पोलीसांना गुंगारा देत मटका सुरू असतो, यामुळे नांदेडच्या गुन्हे अन्वेषण विभागाचे फौजदार दत्तात्रय काळे यांच्या नेतृत्वाखाली पोलीसांनी सोमवारी दुपारी ४ वा. सापळा रचून अचानक पोलीसांनी धाड टाकली.
यावेळी अनेकजण पळून जाण्यात यशस्वी झाले,पण दोन जणांना संदीपसींग राजेंद्रसींग कालोन वय (३५) रा.कासारखेडा ता.जि नांदेड,व गंगाप्रसाद शंकरराव वंगलवार वय (२८) रा.वसरणी ता.नांदेड यांना पकडून अटक करण्यात आली, यावेळी जुगाराचे,मटक्याचे साहित्य व ५१६० रुपयांची रोकड जप्त करण्यात आले, यावेळी अनेक जण चपला व साहित्य सोडून पळून जाण्यात यशस्वी झाले असून,त्यांचाही पोलिस तपास करीत आहे,या दोघावर अर्धापूर पोलिस ठाण्यात गुन्हा अन्वेषण विभागाचे फौजदार दतात्रय काळे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे, याप्रकरणी पुढील तपास जमादार संतोष सुर्यवंशी हे करीत आहेत,आता तरी कायमचा कामठा, मालेगाव परीसरातील मटका बंद होणार की काही दिवसांनी येथे मटका सुरू होणार याविषयी तालुक्यात चर्चा आहे.