नांदेड| प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी, दक्षिण मध्य रेल्वे खाली नमूद केल्याप्रमाणे हुजूर साहिब नांदेड - पुरी – हुजूर साहिब नांदेड दरम्यान दोन विशेष गाड्या चालवेल, ते पुढील प्रमाणे –
1. गाडी क्रमांक 07565/07566 नांदेड - पुरी - नांदेड विशेष गाड्या (02 सेवा): गाडी क्रमांक 07565 हुजूर साहिब नांदेड ते पुरी गाडी नांदेड येथून दिनांक 07 ऑक्टोबर, 2022 रोजी शुक्रवारी दुपारी 15.25 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सायंकाळी 17.30 वाजता पोहोचेल.
परतीच्या प्रवासात गाडी संख्या 07566 पुरी – हुजूर साहिब नांदेड हि गाडी पुरी रेल्वे स्थानकावरून 08 ऑक्टोबर, 2022 रोजी शनिवारी रात्री 22.45 वाजता सुटेल आणि हुजूर साहिब नांदेड येथे दुसऱ्या दिवशी मध्य रात्री 01.00 वाजता पोहोचेल.
या दोन्ही विशेष गाड्या आपल्या मार्गात मुदखेड, धर्माबाद, बासर, निजामाबाद, कामारेड्डी, मेडचल, सिकंदराबाद, काझीपेठ, वारंगल, महबूबाबाद, खम्मम, रायनापडू, एलुरु, राजमुंद्री, समलकोट, अनकापल्ली, दुव्वाडा , सिम्हचालाम रोड, कोत्तावासासा, विजयानागरम, श्रीकाकुलम रोड, पालासा , बेरहमपूर खुर्दारोड, येथे स्थानकांवर दोन्ही दिशांना थांबतील. या विशेष गाड्यांमध्ये ए.सी. टू टियर, ए.सी. थ्री टियर, स्लीपर क्लास आणि सामान्य द्वितीय श्रेणीचे डबे असतील.