याकडे तात्काळ लक्ष देण्याची मागणी
नांदेड| नांदेड शहरातील मध्यवर्ती बसस्थानक हे समस्यांचे माहेघर बनले आहे. या ठिकाणी सुविधांची संख्या जास्त व सुविधा कमी असल्याने प्रवाशी व शालेय विद्यार्थ्यांना दररोज अडचणींचा सामना करावा लागतो आहे. या समस्या पासून सुटका देण्यात यावी आणि येथील रिक्त पदे भरून प्रवाश्याना न्याय द्यावा अशी मागणी आनंद बोकारे यांनी केली आहे.
जिल्ह्यात मध्यवर्ती बस स्थानक मोठे असून त्याचे काम अर्धवट झाले असून व उर्वरित कामे चालू आहे. ग्रामीण भागातील मुदखेड शिराढोण कावलगाव जैतापूर या ग्रामीण भागातील मोठ्या प्रमाणात या भागातून बसेस सोडल्या जातात. परंतु मोठ्या प्रमाणात एसटी बस गळक्या असून, मध्येच पंचर होत आहेत. तसेच नादुरुस्त बसेस या मध्यवर्ती बस स्थानकात पाहायला मिळत आहेत. परंतु कोणत्याही राजकीय नेत्यांनी व परिवहन मंत्री यांनी आतापर्यंत लक्ष दिले नाही. जैतापूर बस सहा वाजताची बस नेहमीच रद्द केली जाते. वेळोवेळी अधिकाऱ्यांना संपर्क साधूनही त्याचा काहीही परिणाम होत नाही.
या भागात बसण्यासाठी जागा सुद्धा उपलब्ध नसून, पुरातन असलेले पत्राचे शेड पूर्ण नादुरुस्त आहे. या भागातील पत्राची शेड पूर्ण गळत असून, प्रवाशांना महिला, विद्यार्थिनींना व वयोवर्द्धांना पावसाळ्यात भिजावे लागत आहे. याकडे कोणीही लक्ष देण्यास तयार नाही या भागात दारुडे व पाकीटमारांचा सुळसुळाट झाला असून, याकडे संबंधितांनी लक्ष देणे गरजेचे आहे.
या भागात पदावर असलेल्या राजकीय, सामाजिक कार्यकर्त्यांनी व परिवहन मंत्र्यांनी याकडे लक्ष देऊन मुदखेडला जाणाऱ्या बसेस या पालकमंत्री अशोक चव्हाण याच्या मतदार संघातील आहेत. या भागातील मुली मुले मोठ्या प्रमाणात शाळेत ये-जा करतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना व मुलींना वेळेवर बस नाही लागली तर दुसऱ्या दिवशी पूर्ण त्यांच्या शाळा - कॉलेजवर परिणाम पडत आहे. मध्यवर्ती बस स्थानकात अनेक पदे रिकामे असल्याची येथील एका अधिकाऱ्याने सांगितले आहे. मध्यवर्ती बस स्थानक प्रमुख हे पदही रिकामे असून, याकडे कोणी लक्ष देण्यास तयार नाही. त्यामुळे पत्राच्या शेडमध्ये मोठ-मोठे कचऱ्याचे ठिकाणी झाले असून तसेच डासांचाही मोठा प्रमाणात उत्पत्ती झाली आहे. या सर्व समस्यापासून सुटका देण्यासाठी या पदाची तात्काळ भरती करण्यात यावी आणि पत्रांची शेड नव्याने उभारण्यात यावी. अशी मागणी पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते आनंदा बोकारे यांनी केली आहे.