तस्वीर तेरी दिल में ला उत्तम प्रतिसाद..NNL

लंडनच्या अलबर्ट हॉलमध्ये कार्यक्रमाचा मान मिळणार्‍या लता दिदी या प्रथम भारतीय नागरिक-डॉ.हंसराज वैद्य


नांदेड|
गान कोकीळा तथा स्वर सम्राज्ञी लता मंगेशकरजी यांच्या 93 व्या  जन्म दिवस तथा जयंती निमित्त  तस्विर तेरी दिल में या संगीत महेफिलीचा अर्थात संगीत मेजवानीचा बहादार कार्यक्र संपन्न झाला.  

प्रास्ताविक करताना डॉ. हंसराज वैद्य यानीं लता मंगेशकरांचा संपूर्ण जीवनपटच रसिकांपुढे उभा केला. ते म्हणाले की, लता दिदीचे जन्म नाव हेमा तर पाळण्यातलं नाव हृदया  मंगेशकर. वडिल मास्टर तथा पंडित दिनानाथ मंगेशकर. आई शुद्धमती तथा माई मंगेशकर.जन्म मद्यप्रदेशातील इंदूर शहरात 28 सप्टेंबर 1929 सालचा. लता दिदी या टोपण नांवानीच त्या अजरामर झाल्या .लता दिदीनीं गायन शिकावे ही आईची दृढ ईच्छा. पण सुरूवातीस वडिलांची ईच्छा  लतानी खूप शिक्षण घेऊन शासकिय नोकरी करावी अशी होती.लतादिदी वडिलांना चोरून त्यांची गाणीं ऐकत व गात.नंतर त्यांचा आवाज व गायनाची ढब पं. दिनानाथजींनाही आवडली.

म्हणून ते लतादिदींचे संगीताचे गुरू बणले. लता दिदींचं मूळ गाव मंगेशी गोवा. भावंडं आशा भोसले, उषा, हृदयनाथ व मीना खडिकर.लताजी सर्वांत मोठ्या दिनानाथजींचं(वडिलांचं) लतांजींच्या वयाच्या तेराव्या वर्षीच निधन झालं. कुटूंबाची संपूर्ण  जवाबदारी लता दिदींवर पडली.त्या स्वतः आजन्म अविवाहित राहून ती जवाबदारी त्यांनी समर्थ पणे पेलली.त्यांचा गायन प्रकार हा कंठ संगित  गायन, पार्श्व गायन व सुगम संगीत.1942 पासून त्यांची खरी कारकिर्द सुरू झाली. त्यानीं मराठीतलं किती हसालहे पहिलं गाणं तर दे दे खुदा के नाम पर प्यारे हे हिंदीतलं आलम आरा चित्रपटातलं 1931साली गायलं. त्या गायिका,संगीतकार (आनंद धन) तर होत्याच पण नाटकात आणि काही चित्रपटातही त्यानीं अभिनय केलेला आहे.

50000च्या वर त्याची गीतं त्यांनीं  ध्वनिमुद्रित करून व गाऊन  गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड  केली आहे. त्या स्वर सम्राज्ञी, गान कोकिळा अशा अनेक उपाद्या  व चित्रपट सृष्टीतील अनेक उत्कृष्ट तथा उत्तम पुरस्कारांच्या मानकरी आहेत. भारत सरकारने त्यांना भारत रत्न हा अतिउच्च असा किताब 2001 मध्येच बहाल करून गौरविले आहे. त्यानीं परदेशीय भाषेतही अनेक गीतं गायली. त्यांना फ्रांस देशाने राष्ट्रीय पुरस्काराने तर इंग्लंड या राष्ट्राने नाइट अँगेल अर्थात गान कोकिळा म्हणून गौरविलेले आहे. त्या अत्यंत सुसंस्कृत, सालस,मृदु भाषी व कुटुंब प्रेमी. खर्या अर्थाने त्या लता दिदीच होत. 

त्यानीं जवळ जवळ सात दशकं जना जनांच्या मना मनांवर तथा हृदया वर अधिराज्य केलं आहे,करत आहेत व करत राहणार आहेत. मला गाणं कळू लागलं तेंव्हाचं त्यानीं गायलेलं व माझं आवडतं अविट असं गाण लटपट लटपट तुझं चालनं गं मोठ्या नखर्याचं,बोलनं ग मंजुळ मैनेचं..! हे गाणं स्तःच्या आवाजात गाताच खच्चून भरलेल्या रसिक श्रोत्यानीं टाळ्याच्या गजरात मोठी दाद दिली. लता दिदी या एकमेव अशा भारतीय नागरिक आहेत की ज्यानां लंडन मधिल अलबर्ट हॉल मध्ये  आपली गायन कला सादर करण्याचा बहू मान मिळाला. अशा या महान गायिका लता दिदीनां आज आपण स्वर सुमनांजली तस्बिर तेरी दिलमें  ने त्यांच्या गाण्यांच्या स्मृतींना उजाळा देणार आहोत.

नांदेड येथील सर्व प्रथित यश व ज्येष्ठ गायक मंजूर हाश्मी(नांदेडचे रफी), विजय बंडेवार(नांदेडचे मुकेश), मेघा गायकवाड(नांदेडच्या गान कोकिळा), हरबंसकौर(नांदेडच्या ज्येष्ठ श्रेष्ठ गायिका-लता- आशा-शमशाद आवाज), उमेशजी देशमुख(विशेष शैलीचे), तसेच लतादिदीनीं ज्यांची स्वतः प्रसंशा केली व फोटोसाठी पोज दिली,फोटोवर हस्ताक्षर केले व पुरूष असूनहि अजन्म लताजिंच्या आवाजात गाणारे परभणीचे प्रसिद्ध गायक श्री नितिन शेवळकर, डॉ.शितल भालके व स्वतः डॉ.हंसराज वैद्य यानीं श्रोत्यांसमोर लता दिदींची गाणीं गाऊन सभागृहाला मंत्र मुग्द केले व वन्स मोरही मिळविले. कार्यक्रम तब्बल 3 तास चालला. श्रोतेही खुर्च्या साडण्यास तयार नव्हते.श्रोत्यातूनही अनेकानीं गायले.


Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी