दोषींवर कठोर कारवाई करण्याची हिंदु जनजागृती समितीची मागणी
मुंबई| दोन वर्षांपूर्वी पालघर येथे हिंदू साधूंना झालेल्या भीषण मारहाणीत त्यांचा मृत्यू झाला होता. या घटनेची जखम भरत नाही, तोच पुन्हा सांगली येथील लवंगा गावात 4 हिंदू साधूंना स्थानिकांकडून बेदम मारहाण झाल्याचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर वायरल झाला आहे. ही घटना संताप आणि चीड आणणारी आहे. या संदर्भात महाराष्ट्र शासनाने तात्काळ दखल घेऊन दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने केली आहे.
सांगली जिल्ह्यातील लवंगा गावात मथुरा (उत्तर प्रदेश) येथून बोलरो गाडीतून आलेले जुना आखाड्याचे चार साधू पत्ता विचारत होते. तेव्हा ते लहान मुले पळवणारे आहेत, असा समज करून स्थानिक जमावाने त्यांना बेदम मारहाण करण्याचा प्रकार घडला, असे समजते. साधूसंतांची भूमी म्हणावणार्या महाराष्ट्रात साधूंना सतत होणार्या मारहाणीमुळे महाराष्ट्राची मान पुन्हा एकदा शरमेने खाली गेली आहे. एखादा मुसलमान मौलवी वा ख्रिस्ती फादर यांच्याविषयी असे कधी घडल्याचे ऐकिवात नाही. निरपराध हिंदू साधूंना मारहाण होणे, ही मानवतेला काळीमा फासणारी घटना आहे, त्यामुळे सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे. हिंदू साधूंविषयी असे वारंवार घडत असेल, तर शासनाने यावर ठोस उपाययोजना काढायला हवी, असेही समितीने दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
श्री. सुनील घनवट, राज्य संघटक, महाराष्ट्र आणि छत्तीसगड, हिंदु जनजागृती समिती. (संपर्क क्र.: 70203 83264)