हिमायतनगरातील दुसऱ्या टप्प्यात मंजूर झालेल्या घरकुल बांधकामास तात्काळ परवानगी द्या -NNL

प्रथम नगराध्यक्ष अब्दुल अखिल अब्दुल हमीद, अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष फेरोज खान पठाण यांनी केली मागणी 

हिमायतनगर| हिमायतनगर शहरात प्रधानमंत्री आवास योजनेतून दुसऱ्या टप्प्यात ९४७ घरकुल मंजूर झाली आहेत. त्या सर्व घरकुल धारकांना नगरपंचायतीने तातडीने बांधकामाची परवानगी द्यावी आणि संबंधित घरकुल धारकांना पहिल्या हप्त्याची रक्कम तात्काळ वितरित करून प्रलम्बित प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी प्रथम नगराध्यक्ष अब्दुल अखिल अब्दुल हमीद, अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष फेरोज खान पठाण यांनी एका निवेदनाद्वारे मुख्याधिकारी जाधव यांच्याकडे केली आहे. 

मागील पंचवार्षिक काळात हिमायतनगर शहरात बाहुल्या टप्प्यात १२२५ घरकुल मंजूर झाले होते. त्यापैकी बहुतांश घरकुलाचे बांधकाम पूर्ण झाले असून, काही घरकुलाचे बांधकाम हप्त्याची रक्कम थकल्याने प्रलंबित आहेत. त्यानंतरच्या अडीच वर्षाच्या काळात घरकुलाचे मंजुरीचे प्रस्ताव डीपीआर तयार केला गेला नसल्याने धूळखात पडले होते. हि बाब लक्षात आल्यानंतर प्रथम नगराध्यक्ष अब्दुल अखिल अब्दुल हमीद आणि त्यांच्या सहकार्यांनी हदगाव - हिमायतनगर तालुक्याचे आ.माधवराव पाटील जवळगावकर यांच्या निदर्शनास आणून दिली होती. याची तात्काळ दखल आ.माधवराव पाटील जवळगावकर घेऊन प्रशासक आणि प्रभारी मुख्याधिकारी याना दूरध्वनीवरून सूचना देऊन कुशाग्र एजन्सीला मुदतवाढ देऊन नवीन घरकुलासाठी लाभार्थ्यांचे अर्ज घेण्यासाठी ८ ते १० दिवसाची मुदत मिळून दिली होती.


त्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील वंचित लाभार्थ्यांच्या घरकुल मंजुरीसाठी स्वतः आ जवळगावकर यांनी मुंबई येथे म्हाडाचे कार्यालय आणि तत्कालीन मंत्री जितेंद्र आव्हाड यांची भेट घेऊन तात्काळ घरकुलास मंजूरी मिळवून आणली. त्यामुळे शासनाकडून मंजूर झालेल्या 947 घरकुल धारकाच्या प्रश्न निकाली निघाला मात्र द्यपही या घरकुल बांधकामास मंजुरी मिळाली नसल्याने अनेकांच्या घरकुलाचे स्वप्न अधांतरी आहे. तीन वर्षांपासून घरकुलाच्या प्रतीक्षेत असलेल्या घरकुल धारकांचे स्वप्न साकार होण्यासाठी तात्काळ या सर्व घरकुल बांधकामांना नगरपंचायतीने परवानगी द्यावी आणि नागरिकांच्या घरकुलाचे स्वप्न साकार करावे अशी मागणी आज दि.१६ रोजी प्रथम नगराध्यक्ष अब्दुल अखिल अब्दुल हमीद, अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष फेरोज खान पठाण यांनी एका निवेदनाद्वारे मुख्याधिकारी जाधव यांच्याकडे केली आहे. यामुळे लवकरच घरकुलाचे बांधकाम सुरु होईल अशी अपेक्षा सर्वाना आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी