नविन नांदेड। नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक १९ मधील सौ.चित्रा सिद्धार्थ गायकवाड यांच्या स्वेच्छा निधी अंतर्गत संभाजी चौक भागातील नुर मस्जिद परिसरातील सिमेंट काँक्रेट रस्ता, बालाजी मंदिर ते नाईकवाडे निवासस्थान,व वसरणी येथील कामाई मंदिर बांधकाम भूमिपूजन माजी नगरसेवक सिध्दार्थ गायकवाड व परिसरातील नागरिक यांच्या हस्ते संपन्न झाले.
स्वेच्छा निधी अंतर्गत दहा लक्ष रुपयांचा निधी मधुन नुर मस्जिद परिसरात, बालाजी मंदिर ते गायकवाड यांच्या निवासस्थाना पर्यंत,तर वसरणी भागातील कामाई मंदिर परिसरात स्वेच्छा निधी दहा लक्ष रुपयांचा निधी अंतर्गत काम होत आहे.यावेळी अध्यक्ष समशोधदीन, अब्दुल लतीफ,शेख लतीफ, मुजीब,शिराजखान,शादुल पठाण,सईद खान,खलील खान, शेख साब,शिराज खान,संजय चाकुरकर,राजु तारू, राहुल यांच्या सह परिसरातील नागरीक यांची उपस्थिती होती