हिमायतनगर तालुक्यात लंपी रोगावर नियंत्रण मिळविण्यासाठी लसीकरण -NNL

तालुक्यात लंपीचा शिरकाव झाला नाही 


हिमायतनगर।
तालुक्यामध्ये लंपी स्किन रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून मागील काही महिन्यापासून पशुसंवर्धन विभाग पंचायत समिती हिमायतनगर अंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये सायपरमेथ्रीनचे वाटप गोमाशा नियंत्रण कार्यक्रम राबवण्यात आला. करंजी येथे लंपीचा प्रादुर्भाव असलेली (गाय )आढळली, त्या गाईचे नमुने प्रयोगशाळेस पाठवण्यात आले आहे. खबरदारी म्हणून पशुसंवर्धन विभागामार्फत करंजी पासून पाच किलो मीटर अंतरात येणाऱ्या सर्व गावांमध्ये लसीकरण घेण्यात आले. पवना, पोटा, दुधड, सोनारी, जवळगाव येथील जनावरांचे लसीकरण झाले असून, आजारी गाईवर उपचार करण्यात आल्यानं सुधारणा झाली आहे.सध्या तालुक्यामध्ये लंपी स्किनचा प्रादुर्भाव असलेला एकही जनावर नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरण्याची आवश्यकता नाही. पण वेळीच लसीकरण करून आपल्या जनावरांना रोगापासून वाचवण्याकरता पशुसंवर्धन विभागाशी संपर्क साधावा असे आवाहन पशुधन विकास अधिकारी डॉ सोनटक्के यांनी केलं.


मागील तीन दिवसा मध्ये करंजी घारापूर,रमणवाडी गणेशवाडी, कारला,सिलोडा, कामारी, पवना, सवना, एकम्बा, सिरजनी, कोठा, कोठा ता., टाकराला, जिरोना, म्हदापूर, चीचोडी, मंगळूर, धानोरा, वारंगटाकली, खेरगाव गावांमध्ये लसीकरण झाले असून आजपर्यंत 7800 व देवकृपा गौशाळा पवना येथील 400 जनावरांमध्ये लसीकरण झाले आहे. रोज 5000 जनावरांमध्ये लसीकरण करण्याचे लक्ष्य ठेऊन पशुसंवर्धन विभाग युद्धपातळीवर लसीकरण करत आहे.

पुढील दोन-तीन दिवसांमध्ये हिमायतनगर तालुक्यातील सर्व गोवंशाची जनावरांमध्ये लसीकरण करण्याचा मानस पशुसंवर्धन विभाग पंचायत समिती हिमायतनगर यांचे असून त्या दृष्टीने सर्व प्रशासन कार्यान्वित आहे असे डॉ. यू. बी.सोनटक्के, पशुधन विकास अधिकारी,पशुसंवर्धन विभाग हिमायतनगर यांनी माहिती दिली.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी