शिराढोण येथील नवरात्र महोत्सव निमित्ताने श्री.भीमाशंकर यात्रा व बक्षीस वितरण व पालखी सोहळा -NNL


उस्माननगर, माणिक भिसे।
उस्माननगर येथून जवळच असलेल्या मौजे शिराढोण ता.कंधार येथे  दरवर्षा प्रमाणे याही वर्षी हिमवत केदार वैराग्य पिठाधीश्वर श्री.श्री.श्री. १००८ जगद्गुरु भीमाशंकर लिंग शिवाचार्य महास्वामीजी ( शिवाचार्य रत्न श्री.ष.ब्र.प्र. षडक्षर शिवाचार्य महाराज शिराढोणकर ) यांच्या सान्निध्यात दि.२६/९ ( सप्टेंबर ) २०२२ ते ५ /१०/ २०२२ ( पाच ऑक्टोबर)  दरम्यान नवरात्र महोत्सवात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत.त्यामध्ये विशेष म्हणजे ४ /१०/( चार ऑक्टोबर) रोज मंगळवारी आश्विन शुद्ध ९ या दिवशी रात्रौ १० ते १ वा.वेळेत गावातील विविध स्पर्धेत यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा पारितोषिक वितरण व  रात्रौ ३ वा. श्री.भीमाशंकर महाराजांची पालखी सोहळा अग्नीकुंड प्रवेश होईल.त्यानंतर यात्रेला प्रारंभ होत आसतो.

उस्माननगर येथून जवळच असलेल्या मौजे शिराढोण येथे  अनेक वर्षापासून नवरात्र उत्सव व भीमाशंकर यात्रा मोठ्या उत्साहात साजरी होत असते. या यात्रेत महाराष्ट्रसह राज्यातून भाविक भक्त मोठ्या श्रद्धेने उपस्थित राहून दर्शन घेतात. महाराष्ट्र सह संपूर्ण राज्यात मागील दोन-तीन वर्षांपूर्वी कोरोना या संसर्गजन्य रोगाने भयभीत झाल्याने यात्रा मोठ्या प्रमाणात साजरी करण्यात आली नव्हती. यावर्षी मोठ्या हर्षवल्लाहासाने ही यात्रा भरविण्यात येत आहे.


या यात्रेला खूप दूरवरून यात्रेकरूंची गर्दी होत असते. विविध राज्यातून भक्तगण दर्शनासाठी गर्दी करतात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी हिमवत केदार वैराग्य पिठाधीश्वर श्री.श्री.श्री.१००८ जगद्गुरु भीमाशंकर लिंग शिवाचार्य महास्वामीजी (  शिवाचार्य रत्न श्री. ष.ब्र.प्र.षडक्षर  शिवाचार्य महाराज शिराढोणकर ) यांच्या सानिध्यात 26 सप्टेंबर 2022 ते 5 ऑक्टोंबर 2022 पर्यंत भीमाशंकर यात्रा व नवरात्र महोत्सव निमित्त दररोज शिवपाठ, दुर्गा सप्तशती, पारायण,रेणुकविजय  पुराण,अखंड,भगवन्नाम सप्ताह,रात्रौ.८ ते ११ शिवकिर्तन  , नंतर शिवभजन इ. कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच 4 ऑक्टोंबर मंगळवारी या दिवशी संध्याकाळी सात ते दहा महाप्रसाद व रात्री १० ते.१ वा.पर्येत गुणवंत विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा पारितोषिक देऊन वितरण सोहळा. त्यानंतर रात्री पहाटे ३ वाजता भीमाशंकर महाराजांची पालखी अग्नि कुंड प्रवेश होईल.

श्री भीमाशंकर यात्रा व नवरात्र महोत्सवात दररोज संध्याकाळी कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे यामध्ये.दि.१६ सप्टेंबर रोजी शि.भ.प.संगिताताई पा.बेद्रीकर ,दि.२७ /९ मंगळवारी शि.भ.प. परमेश्वर केते मांजरमकर ,दि.२८/९ बुधवारी शि.भ.प. कैलास महाराज जामकर दि.२९/९ गुरुवार शि.भ.प. अमोल लांडगे गुरुजी (बनवसकर ) दि.३०/९ शुक्रवारी शि.भ.प. बालाजी भोसकर गुरुजी ( ब्रेदी ) दि.१ ऑक्टोंबर  शनिवारी शि.भ.प. विकास महाराज दसवाडीकर (ता. अहमदपूरकर ) दि.२ ऑक्टोंबर रविवार शि.भ.प. रमेश कस्तुरे दगडगावकर ,दि.३ ऑक्टोंबर सोमवारी शि.भ.प. मनमत आप्पा डांगे गुरुजी उस्माननगरकर ,दि.४ ऑक्टोंबर रोजी शि.भ.प. विश्वनाथ स्वामी पेनुरकर यांचे प्रसादावरील कीर्तन होणार आहे.

दि.5 ऑक्टोबरला विजयादशमी रोजी सकाळी 11 वाजता भीमाशंकर महाराज यांची पालखीचे विसर्जन व जगद्गुरूंचे आशीर्वचन होईल.तरी पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी श्री भीमाशंकर यात्रा व नवरात्र महोत्सवात होणाऱ्या कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होऊन जगद्गुरूंचे आशीर्वाचन व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे यात्रा कमिटी तसेच सदभक्ती मंडळी शिराढोण यांनी आव्हान केले आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी