नविन नांदेड। इंदिरा गांधी वरिष्ठ महाविद्यालय सिडको नांदेड येथील विद्यार्थीनींनी महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या नाट्यमहोत्सवामध्ये उत्कृष्टपणे नाटीका सादर करून उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली.
यामध्ये नाट्यकलावंत म्हणून सेजल कवटीकवार,शिवानी सिरसाट, प्रतिक्षा सोनटक्के गीतांजली जोगदंड, समीक्षा गायकवाड,साक्षी खंदारे, बेगड वाघमारे, निकीता मानकर, दैवाशाला देमेवार,स्वाती वाघमारे, यांना प्रशस्तीपत्र देण्यात आले. याबद्दल महाविद्यालयाच्या वतीने त्यांचा महाविद्यालयाचे उपक्रमशील प्राचार्य डॉ.राजेंद्र माळी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ हनुमंत मारोतीराव भोपाळे डॉ.एल.टी. काळे, डॉ गजानन पाटील , शिवशंकर मुळे यांची प्रमुख उपस्थिती होती.